आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी देशात दोन कर्णधारांबाबत चर्चा सुरू होती. कोहलीला कसोटी आणि रोहितला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवले जावे. मात्र, मालिकेनंतर नवे नाव अजिंक्य रहाणेचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे यात कोहली कुठेच नाही. रहाणेला कसोटीचा आणि रोहितला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे आणि कोहलीचा कर्णधार म्हणून कार्यकाळ संपला आहे अशी मागणी यासाठी पुढे आली आहे. कारण, गेल्या दशकात वेगवेगळे कर्णधार असलेले संघ अधिक यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलिया व विंडीजमध्ये मर्यादित षटक व कसोटी संघाचे कर्णधार वेगवेगळे आहेत. ऑस्ट्रेलियाने २०१५ व २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि विंडीजने २०१२ व २०१६ ची टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली.
काेहलीमुळे विजयाची सवय : मदनलाल
विराट काेहलीमुळे संघाला विजयाची सवय लागली आहे. त्यामुळे त्याच्याकडील नेतृत्व हे कायम राहावे. यातील बदलाचा फटका टीमला बसू शकेल, अशी प्रतिक्रिया माजी खेळाडू मदनलाल यांनी दिली.
शांत रहाणेकडे कसाेटीचे नेतृत्व याेग्य : चॅपेल
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने रहाणेच्या नेतृत्वाबद्दल म्हटले की, ‘तो निर्भीड व चतुर आहे. ते त्याच्यासाठी खूप आहे. कठीण काळात तो शांत राहतो. त्याला सहकाऱ्यांकडून सन्मान मिळतो. हा त्याच्या नेतृत्वातील सर्वात मोठा गुण आहे.’
कोहली फलंदाज म्हणून धाेकादायक : वान
ऑस्ट्रेलियातील विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने म्हटले होते की, ‘बीसीसीआयने कर्णधार म्हणून रहाणेच्या नावावर विचार करायला हवा. कोहली फलंदाज म्हणून आणखी धोकादायक ठरेल. त्यामुळे त्याने खेळाडू म्हणूनच मैदानावर आपले लक्ष केंद्रित करावे. यातून त्याला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावता येईल. याचा निश्चित असा माेठा फायदा टीमला हाेईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.