आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटमध्ये न्यू नॉर्मल:27 वर्षांनी इंग्लंडमध्ये दोन्ही घरचे पंच; दोन्ही कर्णधारांकडे आपापले माइक हाेते

साउथम्प्टन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर परतले, 143 वर्षांत पहिल्यांदा विना प्रेक्षक सामने

सहा हजार क्षमता असलेल्या बाउल स्टेडियममध्ये केवळ २८० जण. सामन्यात दोन्ही स्थानिक पंच. १४३ वर्षांत पहिल्यांदा कसोटीत चाहत्यांची उपस्थिती नाही. नाणेफेकीदरम्यान प्रक्षेपण करणारे गैरहजर. दोन्ही कर्णधारांकडे आपापले माइक. क्रिकेटमध्ये न्यू नॉर्मल आहे. इंग्लंड व वेस्टइंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीतील हे दृश्य दिसले. कोविड-१९ मुळे ११७ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. एवढेच कमी की काय, नव्या नियमासह सुरू झालेल्या खेळात पावसाने व्यत्यय आणला. सामना तीन तास उशिरा सुरू झाला. त्यानंतर ३ षटकांनंतर पुन्हा पावसाने खेळ थांबवला. यावेळी डॉमिनिक सिबलेला (०) गेब्रियलने टिपले. तिसऱ्या षटकात केमर रोचच्या चेंडूवर राॅरी बर्न्सने पहिली धाव घेतली. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने १७.४ षटकांत १ बाद ३५ धावा काढल्या. रॉरी बर्न्स (२०) व जो डेनली (१४) धावांवर खेळताहेत.

143 वर्षांत पहिल्यांदा विना प्रेक्षक सामने

>  नियमानुसार, दोन्ही मैदानी पंच इंग्लंडचे आहेत. १९९३ नंतर पहिल्यांदा असे झाले, जेव्हा इंग्लंडच्या कोणत्या सामन्यात दोन्ही पंच स्थानिक आहेत. स्टुअर्ट ब्रॉड ८ वर्षे व ५१ कसोटीनंतर इंग्लंडच्या कोणत्या सामन्यातून बाहेर आहे. स्टोक्स पहिल्यांदा मोठ्या सामन्यात नेतृत्व करतोय. त्याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली.

>  नाणेफेकी वेळी प्रक्षेपण करणारे आले नाहीत. स्टोक्स व जेसनकडे वेगवेगळे माइक हाेते. त्यांच्यासोबत रेफरी होते. कर्णधारांनी कॅमेऱ्यासमोर उभे राहून मुलाखत दिली.

> ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ - दोन्ही संघांचे खेळाडू व अंपायर यांनी वर्णभेदविरुद्ध गुडघ्यावर बसून निषेध नोंदवला. सर्वांनी ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ प्रकरणाला पाठिंबा दिला. विंडीज संघाच्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ लिहिलेले बॅनरदेखील लावलेले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser