आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Cricket | Ban On Talking To The Media; Threat To Remove From Job; BCCI Secretary Warns 100 Employees Via E mail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:प्रसारमाध्यमांशी बाेलण्यास मनाई; नाेकरीवरून काढण्याची धमकी; बीसीसीआय सचिवांचा ई-मेलवरून 100 कर्मचाऱ्यांना कडक इशारा

मुंबई10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • स्मृती मानधना, पुजारा, जडेजासह पाच जणांना नाडाने पाठवली नाेटीस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची गाेपनीय माहिती लीक झाल्याचा कांगावा करत आता कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बाेलण्यास मनाई करण्यात आली. याशिवाय असे करणाऱ्यांना थेट नाेकरीवरून काढण्यात येईल, अशी धमकीही मंडळाचे सचिव जय शाह यांनी दिली. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी काेणत्याही प्रकारचा संवाद साधता येणार नाही, अशी ताकीद देणारा मेल आता मुख्य कार्यालय मुंबई आणि बंगळुरू येथील जवळपास १०० कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप काेणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. या मेलमुळे सध्या कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. यातून सर्वच कर्मचारी धास्तावले आहेत.

‘आम्हाला नुकतीच माहिती मिळाली आहे. मंडळात कार्यरत असलेले कर्मचारी प्रसारमाध्यमांशी चर्चा करतात आणि मंडळाची गाेपनीय माहिती देतात. त्यामुळेच आम्ही आता खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे. यापुढे अशा प्रकारचे गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही या वेळी सचिव शाह म्हणाले.

स्मृती मानधना, पुजारा, जडेजासह पाच जणांना नाडाने पाठवली नाेटीस

राष्ट्रीय डाेपिंगविराेधी संस्थेने नुकतीच भारतीय संघाच्या चेतेश्वर पुजारा, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, रवींद्र जडेजा, लाेकेश राहुल यांना नाेटीस पाठवली. या पाचही क्रिकेटपटूंनी मागील तीन महिन्यांपासून आपल्या वास्तव्याची कुठलीही माहिती नाडाकडे दिली नाही. त्यामुळेच या सर्वांना नाेटीस पाठवण्यात आली. आता सर्वांना ही माहिती आॅनलाइनच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. नाडाच्या नियमानुसार या सर्व खेळाडूंना आपली सखाेल माहिती देणे सक्तीचे आहे. मात्र, यामध्ये या सर्व खेळाडूंनी हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे नाडाने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...