आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण:कस्टम विभागाच्या कारवाईनंतर हार्दिक म्हणाला- ते घड्याळ दीड कोटींचे होते, पूर्ण कस्टम ड्युटी भरायला मी तयार!

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची 5 कोटींची 2 घड्याळे सीमाशुल्क विभागाने जप्त केली आहेत. कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार, हार्दिककडे या घड्याळाचे बिल नव्हते किंवा त्याने ही घड्याळे आपल्या सामानात घोषित केली नव्हती. मात्र, पंड्याने त्यांची एकूण किंमत 1.80 कोटी सांगितली आहे. एक घड्याळ 1.40 लाखांचे आणि दुसरे 40 लाखांचे आहे.

हार्दिकने दिले स्पष्टीकरण...

सोशल मीडिया पोस्टमध्ये या प्रकरणी स्पष्टीकरण देताना पंड्याने लिहिले की, 'मी भारतीय कायद्याचा आदर करतो. दुबईत खरेदी केलेल्या घड्याळांची किंमत सोशल मीडियावर नमूद करण्यात आली आहे, ते चुकीचे आहे. घड्याळांची किंमत 5 कोटी नाही तर दोन्ही घड्याळांची किंमत सुमारे 1.80 कोटी आहे. मी नियमानुसार घड्याळे खरेदी केली आहेत. त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्यावर नियमानुसार जो काही कर आकारण्यात आला, तो भरण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने माझ्याकडे कागदपत्रांची माहिती मागितली होती, जी मी त्यांना दिली आहे.'

ICC T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. हार्दिक पांड्याही रविवारी रात्री उशिरा टीमसोबत परतला, मात्र कस्टम विभागाने त्याला रोखले आणि त्याची दोन्ही घड्याळे ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या दोन्ही घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये होती.

वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरला
T20 विश्वचषकातील खराब फिटनेस आणि फॉर्म दोन्हीमुळे हार्दिक पांड्याने निराश केले होते. 5 सामन्यांच्या तीन डावात पांड्याने 34.50 च्या सरासरीने फक्त 69 धावा केल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने फक्त चार षटकांवर गोलंदाजी केली आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्या फिटनेसवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत निवड झाली नाही.

आयपीएल फेज-2 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेश खान यांना पहिल्यांदाच T20 संघाचा भाग बनवण्यात आले आहे. अय्यर आणि हर्षलबद्दल सांगायचे तर, दोन्ही खेळाडू बॉल आणि बॅटने संघासाठी चांगला खेळ दाखवू शकतात. माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणतात की व्यंकटेश अय्यर हा हार्दिक पांड्याचा संघात बॅकअप ठरू शकतो. व्यंकटेश अय्यरला अष्टपैलू म्हणून तयार करता येईल, असे ते म्हणाले.

महिलांबद्दल केली होती असभ्य टिप्पणी
तसे, हार्दिकचे वादांशी जुने नाते आहे. 2019 मध्ये, 'कॉफी विथ करण' या टीव्ही शोमध्ये हार्दिकने सहकारी खेळाडू केएल राहुलसोबत महिलांबद्दल असभ्य टिप्पणी केली होती, त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघातूनही वगळण्यात आले होते. मात्र, नंतर त्याने माफी मागितली, त्यानंतर त्याच्यावरील बंदी तात्पुरती उठवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...