आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोहलीची आंतरराष्ट्रीयच्या तुलनेत लीगमधून 214% अधिक कमाई, 13 वर्षांत लीगमधून कमावले 126 कोटी

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनीने 289 % आणि रोहितने 281 % अधिक कमाई केली; 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये स्पर्धा

आयपीएल न केवळ बीसीसीआय तर, खेळाडूंच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे. दोन महिने स्पर्धेत खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांपेक्षा पैसे कमावत आहेत. २००८ पासून त्याची सुरुवात केली. स्पर्धेचे तेरावे सत्र कोरोनामुळे देशाबाहेर खेळवले जाईल. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान लीगचे सामने यूएईमध्ये होतील. भारतीय कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा तिघांनी आयपीएलमधून आतापर्यंत १२० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. हे आंतरराष्ट्रीय सामने व मुख्य करारातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा २०० पट अधिक आहे. कोहलीने २१४ टक्के अधिक कमाई केली. यादरम्यान जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळू इच्छितात.

अशी आहे आंतरराष्ट्रीय कमाई :

सध्या कसोटी खेळल्यानंतर मंडळाकडून १५ लाख, वनडे ६ लाख व १ टी-२० खेळल्यानंतर ३ लाख रुपये सामना निधी मिळतो. २००८ पासून आतापर्यंत तिन्ही खेळाडूंच्या सामन्यांच्या आधारे एकूण रक्कम काढली. मुख्य कराराचा समावेश करत १३ वर्षांतील रक्कम जोडली.

रोहित शर्मा (कर्णधार, मुंबई) : रोहितला आंतरराष्ट्रीयचे १३ लाख मिळाले, ५७ लाख कमी

रोहित शर्माने गेल्या १३ वर्षांत ३२ कसोटी, २२० वनडे व १०३ टी-२० खेळले. त्याला सामन्यात २१ कोटी मिळाले. मुख्य करारातून २५.७ कोटी मिळतात. एकूण ४६.७ कोटी रुपये झाले. एक आंतरराष्ट्रीय सामन्यातून १३ लाख मिळतात. आयपीएलच्या १८८ सामन्यात त्याला १३१.६ कोटी रुपये मिळाले. म्हणून आंतरराष्ट्रीय पेक्षा २८१ टक्के अधिक. लीगच्या सामन्यात ७० लाख कमवतो.

विराट कोहली (कर्णधार, बंगळुरू) : लीगच्या एका सामन्यातून ७१ लाखांची कमाई

कोहलीने २००८ ते आतापर्यंत ८६ कसोटी, २४८ वनडे व ८२ टी-२० सामने खेळले. सामना निधी म्हणून ३०.१ कोटी मिळाले. मुख्य करारातून २८.८ कोटी मिळाले. एकूण ५८.९ कोटी रुपये कमवले. एका आंतरराष्ट्रीय लढतीतून १४ लाख मिळतात. आयपीएलच्या १३ सत्रांत त्याने १२६ कोटी रु. मिळाले. या सामन्यात ७१ लाख कमावतो.

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, चेन्नई) : आयपीएलच्या एका सामन्यात मिळतात ७२ लाख रुपये

धोनीने २००८ पासून आतापर्यंत ६७ कसोटी, २५४ वनडे आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यातून त्याला सामना निधी म्हणून १९.८ कोटी मिळाले. म्हणजे एकूण ४७.६ कोटी रुपये. एका आंतरराष्ट्रीय सामन्यातून धोनीने ११.६ लाख रुपये कमावले. दुसरीकडे, आयपीएलमध्ये १९० सामने खेळल्यानंतर धोनीला १३७.८ कोटी रुपये मिळाले. म्हणजे आंतरराष्ट्रीय मधून २८९ पट अधिक. तो लीगच्या एका सामन्यातून जवळपास ७२ लाख रुपये कमावतो.

लीगमध्ये अव्वल १० कमाई करणाऱ्यांत तीन विदेशी खेळाडू

आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत धोनी पहिल्या, रोहित दुसऱ्या व कोहली तिसऱ्या स्थानी आहे. इतर कोणताही खेळाडू १०० कोटी पेक्षा पुढे जावू शकला नाही. सुरेश रैना (९९.७ कोटी) चौथ्या, गौतम गंभीर (९४.६) पाचव्या, द. अाफ्रिकेचा एबी डिव्हिलर्स (९१.५) सहाव्या, युवराज सिंग (८४.६) सातव्या, विंडीजचा सुनील नरेन (८२.७)आठव्या, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन (७७.१) नवव्या व रॉबिन उथप्पा (७५.२) दहाव्या स्थानी आहे.