आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंड-विंडीज कसोटी:118 दिवसांनंतर उद्यापासून नव्या नियमांसह क्रिकेटचे पुनरागमन; कोरोना विषाणूमुळे काही नवे नियम, बुकलेट जारी

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टेडियममध्ये 50 तेे 70 ऑटोमॅटिक सेन्सरयुक्त सॅनिटायझर मशीन बसवल्या

कोरोनामुळे बंद पडलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने ११८ दिवसांनंतर इंग्लंडच्या साऊथम्पटन येथे नव्या नियमांसह पुन्हा सुरू होत आहेत. ८ जुलै रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीजचा संघ पहिल्या कसोटीत समोरासमोर  असेल. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मैदानात प्रेक्षक हजर नसतील. इव्हेंट संचालक स्टीव्ह एलवर्दी म्हणाले, आता चौकार व षटकार मारल्यानंतर सीमारेषेच्या बाहेरील चेंडू राखीव खेळाडू ग्लोव्हज घालून घेऊन येतील. गोलंदाज लाळेचा वापर करू शकणार नाही. अतिरिक्त खेळाडू कोरोना पर्याय म्हणून उपलब्ध असतील.

स्टेडियममध्ये 50 तेे 70 ऑटोमॅटिक सेन्सरयुक्त सॅनिटायझर मशीन बसवल्या

मैदानात ५० ते ७० ठिकाणी स्वयंचलित हँड सॅनिटायझर मशीन्स बसवल्या आहेत. त्यांचे बटण दाबण्याची गरज नाही. पॅव्हेलियनचे सर्व दरवाजे उघडे ठेवली आहेत. खोलीतील एसीचे तापमान मानकांनुसार निश्चित केले आहे. ड्रेसिंग रूमच्या बाजूला दोन चौरस मीटरची एक स्वतंत्र जागा तयार केली आहे, ज्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल.

नाणेफेकला फक्त रेफरी आणि कॅप्टन हजर

> नवीन नियमांनुसार नाणेफेकच्या वेळी रेफरी व कॅप्टन उपस्थित असेल. ग्राउंड स्टाफ किंवा टीव्ही कॅमेरामन नसेल.

> नाणेफेकीनंतर कॅप्टन हस्तांदोलन करू शकणार नाही.

> अंपायर स्वत: बेल्स घेऊन जातील. ब्रेकदरम्यान स्टम्प्स सॅनिटाइझ केले जातील. 

मैदानातील कर्मचारी-टीव्ही कॅमेरामन खेळाडूंपासून २० मीटर लांब असतील

> मैदानातील कर्मचारी आणि टीव्ही कॅमेरामन खेळाडूंपासून २० मीटर लांब उभे असतील.

> मैदानात उपस्थित सर्व कर्मचारी चिप कार्डसह सज्ज असतील. कारण त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर ते काेणाच्या संपर्कात होते याचा शोध घेणे सोपे जाईल.

महत्त्वपूर्ण बदल असे

> बॉलवर लाळ वापरण्यास मनाई. दोन इशाऱ्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघास ५ अतिरिक्त धावा मिळतील.

> पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी चेंडू संक्रमण मुक्त करण्याची जबाबदारी पंचांची असेल.

> खेळाडूंना हॉटेलमध्ये असे अॅप दिले जाईल, ज्याद्वारे दरवाजे आपोआप उघडतील.

> कोरोनामुळे पहिल्यांदा कसोटी सामन्यात पर्यायी खेळाडूला मान्यता दिली आहे .

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser