आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:रोहित, ईशांतची ऑस्ट्रेलिया वारी निश्चित; दाेघांचाही कसून सराव

मुंबई/दुबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहित शर्माच्या दुखापतीवरून उडाला वादाचा भडका

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला बाहेर ठेवण्यात आले. बीसीसीआयने म्हटले, त्यांच्यावर सलग लक्ष ठेवून आहोत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने संघाच्या घोषणेनंतर सराव करतानाचा रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो मोठे फटके खेळताना दिसतोय.

सध्या रोहितच्या दुखापतीवरून वाद निर्माण झाला आहे. याच वादादरम्यान माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी म्हटले की, खेळाडूंच्या दुखापतीबद्दल पारदर्शकता असावी. चाहत्यांना खेळाडूंच्या दुखापतीबद्दल माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. यादरम्यान ईशांत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जिममध्ये घाम गाळताना दिसला.

सुनील गावसकर म्हणाले की, ‘मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने नेट्समध्ये फलंदाजी करताना काय दाखवले, हे मी पाहिले नाही. त्यामुळे मला माहिती नाही, त्याला काय दुखापत झाली. ताे गंभीर जखमी असता, तर किट घालून सरावासाठी आला नसता. आपण त्या दौऱ्याबद्दल बोलतो, ज्याची सुरुवात डिसेंबरमध्ये होणार आहे. कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरू होईल, जवळपास एक ते दीड महिना शिल्लक आहे. जर तो मुंबईसाठी नेट्समध्ये सराव करू शकतो, तर इमानदारीने मला माहिती नाही, त्याची दुखापत किती गंभीर आहे.’ माझ्या मते, थोडी पारदर्शकता व मोकळेपणामुळे सर्वांची मदत मिळते, मुख्य म्हणजे रोहितला निश्चितपणे झालेय काय? भारतीय चाहत्यांना त्याची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. रोहितला बाहेर केल्याने प्रश्न उपस्थित होतोय की, पंजाबसाठी मयंक अग्रवालने आपल्या टीमसाठी आयपीएल २०२० चे गत दोन सामने खेळले नव्हते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिन्ही संघांत मयंकचा समावेश आहे.

ईशांतची एनसीएमध्ये तयारीसाठी प्रचंड मेहनत
ईशांतला ‘त्या’ शतकाची संधी

१०० कसोटींपासून तीन पावले दूर असलेला ईशांत सध्या एनसीएमध्ये आहे. कसाेटीचे शतक पूर्ण करणारा ईशांत हा कपिलदेवनंतर भारताचा पहिला वेगवान गाेलंदाज ठरेल. ईशांत १८ नोव्हेंबरपासून सराव सुरू करू शकतो. सामना खेळण्यापूर्वी त्याला एका सराव सामन्याची गरज आहे. कसोटी मालिका १७ नोव्हेंबरपासून सुरू होतेय.

तेवतिया, अक्षरला तरीही डच्चू
अक्षरने यंदा आयपीएलमध्ये १० सामन्यांत ८ बळी घेतले. त्याची इकॉनॉमी ५.७८ राहिली. त्याचप्रमाणे, तेवतियाने ७.१५ च्या इकॉनॉमीने ७ बळी घेतले आणि जडेजाने ९.२६ च्या इकॉनॉमीने केवळ ४ विकेट घेतल्या. तेवतियाने २२४ व जडेजाने २०१ धावा काढल्या. तरीही अक्षर पटेल आणि राहुल तेवतियाला दाैऱ्यात संधी मिळाली नाही.

हरभजनचे निवडीवर प्रश्नचिन्ह
सूर्यकुमार यादव आयपीएल व रणजीमध्ये सलग चांगले प्रदर्शन करतोय. वेगवेगळ्या व्यक्तींच्या निवडीसाठी दाेन नियम आहेत. निवड समितीने त्याची कामगिरी पाहावी. वरुणच्या निवडीवर आनंद व्यक्त केला. सूर्यकुमारने आयपीएलमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने २८३ धावा काढल्या, असे सांगून भज्जीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बातम्या आणखी आहेत...