आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टिम ब्रेसननने सचिन तेंडूलकरला आउट करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ब्रेसननच्या मते, 2011 मध्ये ओव्हल कसोटीत सचिन तेंडूलकरला 100 वे कसोटी शतक करण्यापूर्वी बाद केल्यास त्याला आणि ऑस्ट्रेलियन अंपायर रॉड टकरला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
ब्रेसननने सांगितले की, ओव्हल कसोटीच्या चौथ्या डावात सचिन 91 धावांवर खेळत होता. तेव्हा त्याच्या चेंडूवर अंपायर टकरने सचिनला पायचीत बाद दिले होते.
सचिन बाद झाला नसता तर त्याने शतक पूर्ण केले असते - ब्रेसनन
ब्रेसननने इंग्लिश काउंटी क्लब यॉर्कशायरच्या पॉडकास्टमध्ये म्हटले की, "तो चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात होती आणि ऑस्ट्रेलियन अंपायर टकरने सचिनला बाद घोषित केले. तेव्हा तो 91 धावांवर खेळत होता आणि नक्कीच त्याने शतक पूर्ण केले असते. आम्ही भारताविरोधात ती मालिक जिंकलो आणि जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ झालो."
मला ट्विटरवर जीवे मारण्याची धमकी मिळाली
ब्रेसनन म्हणाला की, "या घटनेनंतर आम्हाला दोघांना (ब्रेसनन आणि टकर) जीवे मारण्याची धमकी मिळत होती. मला ट्विटर आणि अंपायर टकर यांना त्यांच्या घरी धमकीचे पत्र मिळाले. जीवे मारण्याची धमकी सोबत लिहिले होते की, तुम्ही त्याला (सचिन) कसे बाद दिले? चेंडू लेग साइडच्या बाहेर जात होती."
पंच टकरला वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी आपल्याबरोबर सोबत घ्यावे लागले
ब्रेसननच्या मते, या धमक्यांना घाबरून टकर यांनी आपली सुरक्षा वाढवावी लागली. ते म्हणाले की, "काही महिन्यांनंतर ते मला मिळाले आणि म्हणाले की, मित्रा, मला सुरक्षा रक्षक ठेवावे लागेल. ऑस्ट्रेलियात त्यांच्या घराजवळ पोलिस तैनात होते."
सचिनने 2012च्या आशिया चषकात 100 वे शतक ठोकले होते
सचिन तेंडूलकरने 2011 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रीका विरुद्ध 99 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले होते. 100 वे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी एक वर्ष वाट पाहावी लागली. 2012 च्या आशिया कप स्पर्धेत त्याने बांगलादेशविरोधात 114 धावा करत शतकांचे शतक पूर्ण केले.
सचिन 100 आंतरराष्ट्रीय शतक करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटीत 15,921 आणि एकदिवसीय सामन्यांत 18,426 धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 51 तर वनडेमध्ये 48 शतक केले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.