आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लाॅकडाऊनमुळे सध्या मार्चपासून जगभरातील क्रिकेटच्या स्पर्धांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत. मात्र, आता जुलैपासून क्रिकेटला सुरुवात हाेण्याची शक्यता आहे. अशात आता कसाेटीच्या फाॅरमॅटमधील गाेलंदाजांना मैदानावर पुनरागमन करणे फारच आव्हानात्मक असेल, अशी प्रतिक्रिया आयसीसीच्या तज्ञांनी दिली. यासाठी या गाेलंदाजांना ८ ते १२ आठवड्यांच्या ट्रेनिंगची माेठी गरज आहे, असेही आयसीसीने सांगितले. कारण या गाेलंदाजांना मैदानावर खेळत असताना दुखापतीचा माेठा धाेका असणार आहे. त्यामुळे दुखापती टाळण्यासाठी गाेलंदाजांना सातत्याने सराव करावा लागेल. क्रिकेट आता नव्या उमेदीतून मैदानावर कमबॅक करणार आहे. यासाठी आयसीसीने गाइडलाइन तयार केली आहे. त्यामुळे आता जुलैपासून स्पर्धांना सुरुवात हाेण्याचे सकारात्मक चित्र निर्माण झालेले आहे. याची अधिकृत घाेषणा परिस्थिती पाहून करण्यात येईल.
खेळाडूंना घ्यावी लागेल काळजी; स्वत:च्याच साहित्याचा वापर
> सरावासाठी अधिकृत अशी परवानगी गरजेची आहे. सरकार आणि आयसीसीच्या नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे लागेल.
>क्रिकेटच्या पुनरागमन प्लॅन तयार करताना मंडळाकडून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे सक्तीची असेल.
> खेळाडूंच्या आराेग्याच्या दृष्टीने काेणत्याही प्रकारचा धाेका निर्माण हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रशिक्षक व मैदानाची पाहणी केली जावी. त्यानंतर निर्णय घ्यावा.
> प्रवासासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर असावा. यादरम्यान सुरक्षितता पाळली जावी.
> संघांना स्थानिक नियमानुसार टेस्टिंग आणि स्क्रीनिंग करणे सक्तीचे असेल. क्वॉरंटाइनचा नियम असल्यास त्याचेही सर्व खेळांडूंना पालन करावे लागेल.
> सर्वच खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था स्वतंत्र खाेलीत करावी. तसेच स्वतंत्र्य इमारती असावी.
> खेळाडूंना स्वत:लाच साहित्याचा वापर करावा लागेल. त्यासाठीच्या नियमाचे पालन सक्तीचे असेल.
पाक, विंडीज संघाच्या इंग्लंड दाैऱ्यावर प्रश्नचिन्ह; सराव बंद
पाकिस्तान आणि विंडीजचा संघ आगामी जुलै-आॅगस्टमध्ये इंग्लंडचा दाैरा करणार आहे. या दाैऱ्यात दाेन्ही संघ कसाेटी मालिका खेळणार आहेत. मात्र, आता या दाेन्ही संघांचा सराव बंद आहे. त्यामुळे सरावाच्या अभावामुळे या दाैऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याशिवाय या दाैऱ्यावर गेल्यानंतर दाेन्ही संघांचे खेळाडू १४ दिवस क्वाॅरंटाइनमध्ये राहतील.
वनडे, टी-२० साठी सहा आठवड्यांच्या सरावाची गरज
वनडेत एक गाेलंदाज कमीत कमी १० आणि टी-२० मध्ये चार षटके टाकताे. त्यामुळे या फाॅरमॅटमधील गाेलंदाजांना मैदानावर कमबॅक करण्यासाठी अवघ्या सहा आठवड्यांच्या सरावाची गरज आहे. यातून गाेलंदाज या फाॅरमॅटच्या सामन्यात अव्वल कामगिरी करू शकतील. भारताच्या गाेलंदाजांचा दाेन महिन्यांपासून मैदानावरील सराव पूर्णपणे बंद आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.