आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसमुळे भारतीय क्रिकेट संघाचा जून-जुलैमध्ये होणारा श्रीलंका दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने एक विधान जारी करत ही माहिती दिली. दोन्ही देशांमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार होती.
श्रीलंका क्रिकेटने विधान जारी करत म्हटले की, "जून-जुलैमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दौरा आता वेळापत्रकानुसार होणार नाही. कोरोनामुळे सध्या दौरा करणे सुरक्षित नसल्याचे बीसीसीआयने आम्हाला सांगितले." यामुळे भारतीय संघ श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी येऊ शकणार नाही. परंतु हा दौरा रद्द करण्यात आला नसल्याचेही सांगण्यात आले.
भविष्यातील टूर प्रोग्रामनुसार दोन्ही बोर्ड एकमेकांच्या विरुद्ध खेळण्यास तयार आहेत. यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येईल. 13 मार्चनंतर कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लगाम लागला आहे. 8 जुलैपासून इंग्लंड-वेस्टइंडिजमध्ये सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होईल.
सरकारच्या मंजुरीनंतरच टीम इंडिया श्रीलंका दौर्यावर जाईल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने परवानगी दिल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतो. बीसीसीआयने ई-मेलवेर श्रीलंका क्रिकेट बोर्डला ही माहिती दिली.
ई-मेलमध्ये बीसीसीआयने लिहिले की, आम्ही एफटीपी आणि संबंधित मंडळाला बांधील आहोत पण सद्य परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या भेटीचा निर्णय घेण्यापूर्वी भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची आपण काळजी घेतली पाहिजे.
सरावाशिवाय मालिका शक्य नाहीः बीसीसीआय
ही मालिका आधीच रद्द होण्याची अपेक्षा होती कारण भारतीय खेळाडूंनी अद्याप सराव सुरू केला नाही. बीसीसीआयच्या एक अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, सराव सुरू झाल्यानंतरही खेळाडूंना फिटनेस परत मिळण्यास चार ते सहा आठवडे लागतील. सध्या परदेशी प्रवासावरही बंदी आहे. अशा परिस्थितीत जून-जुलैमध्ये श्रीलंका दौरा होणे शक्य नव्हते.
जानेवारीत श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला होता
श्रीलंकेचा संघ यावर्षी जानेवारीत भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही देशांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिकी झाली होती. भारताने 2-0 च्या फरकाने ही मालिका जिंकली होती. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारतीय संघाने दुसरा टी-20 78 धावांनी आणि तिसरा सामना 7 गड्यांनी जिंकला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.