• Home
  • Sports
  • Cricket
  • Cricket : Virender Sehwag said Dhoni is unlikely to return to Team India, Pant and Rahul have replaced him

क्रिकेट / वीरेंद्र सेहवाग म्हणाला - महेंद्रसिंग धोनी संघात परतण्याची शक्यता नाही, पंत आणि राहुल यांनी घेतली जागा

  • लोकेश राहुल चांगल्या फॉर्ममध्ये, त्याला संघाबाहेर काढणे अवघड - सेहवाग 

विशेष प्रतिनिधी

Mar 19,2020 02:54:32 PM IST

अहमदाबाद - भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने महेंद्रसिंग धोनीच्या संघातील पुनरागमनाबाबत वक्तव्य केले आहे. सेहवाग म्हणाला की, महेंद्रसिंग धोनी संघात परतण्याची शक्यता नाही. कारण ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांनी विकेटकिपर म्हणून संघात जागा मिळवली आहे. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असून त्याला संघाच्या बाहेर करणे अवघड आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमधील वनडे विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवांनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धेवरही संकट ओढावले आहे.

सेहवाग स्पोर्ट वेअर स्टोअर

सेहवागने मंगळवारी अहमदाबादमध्ये आपल्या पहिल्या स्पोर्ट वेअर स्टोअरचे उद्घाटन केले. यावेळी बोलतांना तो म्हणाला की, 40 ते 50 स्टोअर्स सुरु करण्याची योजना आहे. अगोदर दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर सुरू करण्याची तयारी होती. परंतू, कोरोनामुळे गुजरातला यावे लागले.


सेहवाग राजकारणात प्रवेश करण्याबाबत म्हणाला...

राजकारणातील प्रवेशावर बोलतांना सेहवाग म्हणाला की, मी राजकारणात जाणार नाही. सेहवागचा मित्र

गौतम गंभीर खासदार आहे. बीसीसीआयचे अध्‍यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गां‍गुलीबाबत बोलतांना म्हणाला की, बोर्डाची जबाबदारी स्वीकारून त्‍यांना खूप कमी दिवस झाले आहे. येणाऱ्य़ा काही दिवसांत ते येथे खुप चांगले काम करून दाखवतील. जसे कर्णधारपदी असतांना पाहिले होते. आयपीएलच्‍या आयोजनावर बोलतांना त्याने सांगितले की, सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. सरकारने सर्व क्रीडा स्पर्धा कमी कालावधीच्या किंवा बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.

2020 अखेरपर्यंत वीरेंद्र सेहवागचे आत्‍मचरित्र येणार

वीरेंद्र सेहवाग आपल्या आत्मचरित्राच्या लिखाणावर काम करत आहे. मागील 8 महिन्‍यांपासून तो यावर काम करीत आहे. 2020 अखेरपर्यंत त्‍यांचे पुस्‍तक बाजारामध्‍ये येईल. तो शिकवणीवर बोलतांना म्हणाला की, अजून यावर कोणताही विचार केला नाही. माझी अॅकडमी व्यतिरिक्त शाळा देखील आहे. त्‍यामुळे हे सध्या शक्‍य होणार नाही.

X