आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:वीरेंद्र सेहवागला रामायणातील 'त्या' प्रसंगातून मिळाली बॅटिंगची प्रेरणा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन दरम्यान दूरदर्शनवर रामायण प्रसारित केली जात आहे, यातील एका दृष्याचा फोटो वीरूने शेअर केला

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने रामायणातील एका दृष्याचा फोटो शेअर करत टीकाकारांना उत्तर दिले आहे. सेहवागने अंगद रावणाला आपला पाय हटवण्याचे आव्हान देतानाचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने लिहिले की, "मला याच प्रसंगातून फलंदाजीची प्रेरणा मिळाली. पाय हटवणे कठीण नाही तर अशक्य आहे." टीकाकार नेहमीच सेहवागच्या फुटवर्कबाबत टीका करतात. वीरू या फोटोतून याचेच उत्तर दिले आहे. 

सेहवागने पोस्ट केलेला फोटो हा रावणाच्या दरबारातील आहे. जेव्हा दरबारातील प्रत्येकजण अंगदचा पाय हटवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही यशस्वी झाले नाही. युद्धाच्या अगोदर शेवटच्या वेळेस रामाचा संदेशवाहक बनून अंगद रावणास समजवण्यास गेला होता, मात्र रागावलेल्या रावणाने हा संदेश धुकडावून लावला. यातील अंगदचा पाय हटवण्याचा रावणाचा फोटो सेहवागने पोस्ट केला.

कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्व मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात झाले आहे. अशा परिस्थितीत दूरदर्शनने रामानंद सागर कृत 'रामायण' ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला ही मालिका देशात सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका आहे. 

बातम्या आणखी आहेत...