आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी इंटरव्ह्यू :बुद्धिबळपटाची तुलना क्रिकेटशी करत चहल म्हणाला- लेगस्पिन, गुगली, फ्लिपर, डाऊन स्पिन आहेत राजा, मंत्री, घोडा, हत्तीसारखे

भोपाळ (कृष्णकुमार पांडेय)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय संघाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने सांगितले आता फक्त क्रिकेट सुरू व्हावे, विश्वचषक असो की आयपीएल

भारतीय संघाचा लेगस्पिनर यजुवेंद्र चहल लॉकडाऊनमध्ये क्रिकेटची खूप आठवण काढतोय. आता हळूहळू सर्व गोष्टी अनलॉक होत असून तोदेखील आता मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे. तो म्हणतो, आता फक्त क्रिकेट सुरू व्हावे, ते विश्वचषक असो की आयपीएल स्पर्धा. त्याच्या मते, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर संघाने सराव सुरू केला पाहिजे. त्याने बुद्धिबळपटाची तुलना क्रिकेट खेळपट्टीशी करत म्हटले, “लेगस्पिन, गुगली, फ्लिपर व डाऊन स्पिन माझे अस्त्र म्हणजे राजा, मंत्री, हत्ती, घोडा आहे.’

> वैज्ञानिक, डॉक्टर्स म्हणतात की, आता कोरोना लवकर संपणार नाही. त्याच्यासोबतच जीवन जगणे शिकावे. यातून क्रिकेटमध्ये काय बदल ?

त्यावर आयसीसीच्या सूचना आल्या आहेत. आपल्याला त्या पाळाव्या लागतील. बदलांवर आता काही बोलणे घाईचे ठरेल. जोपर्यंत मैदानात उतरणार नाही तोपर्यंत कळणार नाही. पहिले कधी अशा परिस्थितीत खेळलो नाही. त्यामुळे काही सांगणे कठीण आहे.


> भविष्यात औषध येईपर्यंत विनाप्रेक्षक सामने होऊ शकतात, तुझ्यासाठी कसा अनुभव राहील?

थोडे वेगळे वाटेल. आम्ही प्रेक्षकांमध्ये खेळतो. चाहते आम्हाला प्रोत्साहन देतात. माझ्या मते, आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम श्रेणी लढतीसारखा अनुभव येईल. त्यात प्रेक्षक नसतात.


> चेंडू चकाकीसाठी लाळेवर बंदीची चर्चा आहे. फिरकीपटूंना अडचण येईल किंवा फायदा होईल?

काही सांगू शकत नाही. अशा चेंडूने कधी खेळलो नाही. माहिती नाही चेंडू कसा परिणाम करेल. तो ड्रिफ्ट किंवा स्विंग. सरावानंतरच त्या गोष्टीची माहिती होईल. हे सर्वांसाठी नवे असेल.


> श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड टीमचा सराव सुरू, मैदानावर भारतीय खेळाडू केव्हा उतरू शकतील?

श्रीलंकेतील परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्यापेक्षा आमची लोकसंख्या अधिक असून कोरोना प्रकरणेदेखील जास्त. जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल त्यानंतर सराव सुरू केला पाहिजे. आपल्या स्वत:सह दुसऱ्याच्या सुरक्षेवरदेखील लक्ष ठेवावे लागेल. आज कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आपण कोणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ देऊ शकत नाही.


> आतापर्यंत कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली नाही. आगामी मालिकेत अाशा आहे का?

त्याबद्दल काही विचार करत नाही. माझे पूर्ण लक्ष्य पुनरागमनावर आहे. जेव्हा मैदानावर परतेल तेव्हा लवकर लय मिळायला हवी ही इच्छा आहे.


> लॉकडाऊनमध्ये काय काय केले?

काही विशेष नाही. घरीच राहतो आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवतो, मजा करतोय. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून मेहनत घेतोय. रविवारी आराम करतो.


> आवडते मैदान कोणते, सर्वाधिक गोलंदाजी करायला आवडणारे ठिकाण कोणते?

बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम. ते आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे घरचे मैदान आहे. तेथे दीर्घकाळापासून खेळतोय. टी-२० मध्ये पहिल्यांदा पाच बळी तेथेच घेतले होते. त्यामुळे तेथे सर्वाधिक आनंद मिळतो.


> फलंदाज चेंडूवर मोठे फटके मारतात तेव्हा मानसिकतेवर कसे नियंत्रण ठेवतो ?

तो खेळाचा एक भाग आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका षटकात तुम्हाला सहा षटकार मारले जाऊ शकतात किंवा कमी. तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत असायला हवे. असे नाही, एक स्पेल खराब गेले म्हणून दुसरेदेखील तसेच जाईल. दुसऱ्यात बळी मिळू शकतो. मी चालू परिस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो.


> आयपीएलमध्ये तुझा संघाला किताब ?

यंदा अामचा संघ मजबूत आहे. त्यामुळे अाता पाहू काय होते ते? याशिवाय अाता आयपीएल कोणत्या परिस्थितीमध्ये सुरू होते त्यावर गोष्टी अवलंबून आहेत.


> बुद्धिबळपटात अनेक अस्त्रे असतात त्यामुळे आपण चाल खेळतो. पिचवर तुझे शस्त्र कोणते?

क्रिकेट खेळपट्टीवर चार प्रकारची शस्त्रे असतात - लेगस्पिन, गुगली, फ्लिपर व डाऊन स्पिन. त्याचा वापर परिस्थितीनुसार करतो. तुम्हाला कोणत्या फलंदाजाला कोणता चेंडू टाकायचा त्यावर अवलंबून आहे.  

0