आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी भारतीय आहे, मात्र कुणी चर्चा करत नाही, काही युवा एका सत्रात चांगले खेळून संघात येतात : मिश्रा

विमलकुमार | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने आयपीएलमध्ये 147 लढतींत 157 बळी घेतले

लेगस्पिनर अमित मिश्रा अनेक वेळा भारतीय संघातून आत-बाहेर होत होता. त्याने भारतीय संघाकडून अखेरचा सामना २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला. ३ वर्षांपासून राष्ट्रीय संघातून बाहेर असलेल्या ३७ वर्षीय अमितला संघात परतण्याची अाशा आहे. अमितने २००३ मध्ये पदार्पण केले होते. अमितने म्हटले, आयपीएलमधील मी सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. मात्र त्याची चर्चा हाेत नाही. दुसरीकडे, युवा खेळाडू एका सत्रात चांगली कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवतो.

> तू दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहेस. तुला त्याचे श्रेय मिळत नाही असे वाटते का?

तुम्ही पहिले व्यक्ती आहात, ज्यांनी मला असे म्हटले. यापूर्वी कोणी माझा परिचय आयपीएलमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून केला नाही. मला संधी मिळाली असती तर बळी वाढले असते.

> योग्य सन्मान मिळत नसल्याचे तुला वाटते का? त्याबाबत तू नाराज आहेस का?

निश्चितच वाटते. मी गेल्या २ वर्षांत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. यादरम्यान मी भारतीय संघातून बाहेर आहे, मात्र कुणी चर्चा करत नाही. अनेक वेळा एखादा युवा खेळाडू केवळ एकाच आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियात स्थान मिळवतो. मला माझी लढाई स्वत:च जिंकायची आहे.

> संघात पुन्हा एकदा पुनरागमन शक्य आहे?

निश्चित शक्य आहे. त्यामुळे मी अद्याप खेळताेय. मी केवळ आयपीएलमध्ये क्रिकेट खेळणारा गोलंदाज नाही.

> पुनरागमन किती कठीण आहे?

आधी खूप व्यग्र राहत असे, खूप क्रिकेट होत होते. पुनरागमनासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे.

> आयपीएलमध्ये हॅट््ट्रिक व भारतीय संघात स्थान मिळवले... दोघांत सोपे काय आहे?

संघात पुनरागमन करणे कठीण राहिले. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी व हरियाणासाठी रणजीत कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी बजावल्यानंतरही राष्ट्रीय संघात पुनरागमन होऊ शकले नाही. हॅट्ट्रिक करणे तुमच्या हातात असते हाच दोन्हीतील फरक आहे.

> तू कधी नाराज झाला का? खेळ सोडण्याची इच्छा झाली का?

हो, नक्की झाली. मी खेळणे सोडले तर फायदा कुणाचा होणार, विरोधकांचा. नकारात्मक विचारांपासून वाचवण्यासाठी खूप कमी लोक सोबत उभे राहतात. अशात मी स्वत:ला प्रोत्साहित करतो.

> टी-२० मध्ये लेगस्पिनरचा प्रभाव आहे, मात्र आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल १० मध्ये एकही लेगस्पिनर नाही असे का?

मेहनतीच्या अभावामुळे असे हाेते. मला आठवते की, अनिल कुंबळे व शेन वाॅर्न स्वत:वर खूप मेहनत घेत होते. मला एकदा तेंडुलकरने म्हटले होते, विदेशी दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याची तयारी अनेक महिन्यांपूर्वी सुरू केली पाहिजे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक ३ हॅट्ट्रिककचा विक्रम

अमित मिश्राने भारतासाठी २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी-२० सामने खेळले. त्याच्या नावे अनुक्रमे ७६, ६४ व १६ विकेट आहेत. पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक १८ बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. १४७ आयपीएल सामन्यांत १५७ बळी घेत ताे स्पर्धेतील भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये ३ वेळा हॅट्ट्रिकक त्याच्या नावे आहे.

बातम्या आणखी आहेत...