आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:धोनीची बरोबरी होऊ शकत नाही; मात्र गंभीरला संधी मिळाली असती तर तो उत्कृष्ट कर्णधार ठरला असता : इरफान

नवी दिल्ली / विमल कुमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने म्हटले - भविष्यात विदेशी लीगमध्ये खेळू शकतो

माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने म्हटले की, विजयाच्या बाबतीत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बरोबरी कोणी करू शकत नाही. मात्र, गौतम गंभीरला अधिक संधी मिळाली असती तर तो एक उत्कृष्ट कर्णधार सिद्ध झाला असता. संघाकडून १७३ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या अष्टपैलू पठाणने करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, त्यासाठी तो कुणाला दोषी मानत नाही. भविष्यात तो विदेशी लीगमध्ये खेळताना आपणास दिसू शकतो. त्याच्याशी झालेला चर्चेतील काही भाग...

प्रश्न : तू आयपीएलदरम्यान समालोचन करू शकतोस. तू पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतोस का? विशेषत: विदेशी लीगमध्ये?
- निवृत्तीच्या पूर्वी मला क्रिकेटमध्ये मजा येत नव्हती. मात्र, मी जेव्हा मुंबईत रोड सेफ्टी स्पर्धा खेळलो, तेव्हा मला पूर्वीसारखी मजा आली. थेट मी काही सांगू शकत नाही, मात्र भविष्यात काहीही होऊ शकते.

प्रश्न : तू इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सचे कौतुक केलेस. भारताकडे पण अष्टपैलू हार्दिक पंड्या आहे, त्याच्याबद्दल काय मत आहे?
- स्टोक्सने आपल्या देशाला खूप सामने जिंकून दिले आहेत, त्यामुळे तो स्टार आहे. भारतालादेखील तसाच अष्टपैलू मिळावा अशी माझी इच्छा आहे. पंड्या कोणत्याच प्रकारात क्रमवारीत अव्वल दहामध्ये नाही, ही शोकांतिका आहे. त्याच्यात निश्चित क्षमता आहे, मात्र भारताला चेंडू व बॅटने सामना जिंकून देणाऱ्या अष्टपैलूची गरज वाटते. तेवढीच कमतरता आहे भारतीय संघात.

प्रश्न : तुझ्या अष्टपैलूचे आकडे कपिल देवनंतर चांगले आहेत. कपिलसोबत एखाद्या युवा खेळाडूची तुलना होताना आधीे तो त्या दर्जापर्यंत पोहोचायला हवा, असे वाटत नाही का?
- वास्तविक असा कोण विचार करतो? मी क्रिकेट माझ्या मर्जीने खेळले. माझ्याकडे कुणी पीआर करणारा नव्हता. माझा कुणी गॉडफादरदेखील नव्हता. माइक हातात घेऊन बसलेले अनेक मोठे लोक माझ्याबद्दल काही बोलत नाहीत. मात्र, त्यामुळे काही फरक पडत नाही.

प्रश्न : धोनीच्या नेतृत्वाचे तू खूप कौतुक करताना दिसत नाहीस, असे का?
- लोक राहुल द्रविडच्या नेतृत्वाचे कौतुक करतात, ज्याच्या नेतृत्वात धावांचा पाठलाग करत संघाने सलग १६ सामने जिंकले. धोनीचे निकाल व विजय पाहिल्यास त्याला तोडच नाही. मला धोनीसह दादा व कुंबळेचे नेतृत्व आवडते. मात्र, एक व्यक्ती आहे, ज्याला श्रेय मिळले नाही, तो म्हणजे गौतम गंभीर. गंभीरला नेतृत्वाची अधिक संधी मिळायला हवी होती, तो उत्कृष्ट कर्णधार सिद्ध झाला असता.

प्रश्न : तू सोशल मीडियातील ट्रोलिंगला कसे हाताळतो?
- काही लोक नेहमी नकारात्मक दृष्टीने पाहतात. तुम्ही डावीकडे जााल, तर ते उजवीकडे जायचे म्हणतात. असे लोक आपल्या कुटुंबातदेखील सापडतात. त्यामुळे फरक पडत नाही. जवळच्या लोकांच्या भाषेमुळे मला त्रास होतो.

प्रश्न : इरफान भविष्यात राजकारणात दिसेल का?
- भविष्यात मला वाटले की, लोकांची सेवा करायची आहे तर नक्की दिसेल. मात्र, ते पूर्ण इमानदारीने करेल. मला पैसे कमावण्यासाठी किंवा दुसऱ्याच्या अजेंड्यासाठी राजकारणात यायचे नाही. आतापर्यंत मी एक-एक पैसा इमानदारीने कमावला. लोकांसाठी काही चांगले होऊ शकत असेल तर येईन, अन्यथा नाही.

प्रश्न : टीकाकार म्हणतात, ग्रेग चॅपेलने तुला बरबाद केले?
तुम्हाला काय वाटते, एखादी व्यक्ती कुणाला बरबाद करू शकते का? मी माझे अपयश व संघर्षासाठी कुणाला दोषी ठरवत नाही. मी देवाचे आभार मानतो की, मी भारतासाठी दीर्घकाळ खेळलो आणि मला खूप प्रेम मिळाले. मला हवा तेवढा पाठिंबा मिळाला नाही, ज्याचा मी हक्कदार होतो, तेवढी खंत आहे. ज्या खेळाडूंनी आपल्या अखेरच्या सामन्यात ५ विकेट घेतल्या, त्याला पुढील सामन्यात अपयशी ठरेपर्यंत संधी दिली जात नाही, असे माझ्यासोबत घडले आहे.

बातम्या आणखी आहेत...