आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला पोर्तुगालमध्ये आपल्या 'फॉरेव्हर होम' साठी शेफ शोधणे कठीण जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोने कुटुंबासाठी पोर्तुगालमध्ये घर बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आत्तापर्यंत येथे आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ शिजवणारा आचारी सापडलेला नाही.
फुटबॉलपटू आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज एक कुक शोधत आहेत जो त्यांच्या कुटुंबातील पोर्तुगीज अन्न तसेच आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ, विशेषत: सुशी देऊ शकेल. या कामासाठी रोनाल्डो शेफला 4,500 युरो म्हणजेच सुमारे 4 लाख 52 हजार रुपये मासिक पगार देखील देण्यासाठी तयार आहे.
37 वर्षीय रोनाल्डोने 2021 मध्ये पोर्तुगालमधील क्विंटा दा मारिन्हा येथे कुटुंबासाठी जमिन विकत घेतली होती. यावर सुमारे 150 कोटी रुपयांचा आलिशान व्हिला जूनपर्यंत तयार होईल. यापूर्वी त्याने घरासाठी बटलर, स्वयंपाकी, क्लिनर आणि माळी यांना दरमहा साडेपाच लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते.
यानंतर त्याने एका बटलरला साडेचार लाखांहून अधिक पगारावर नोकरी दिली, मात्र शेफची जागा अद्यापही रिक्त आहे. रोनाल्डोला जपानी सुशी खायला आवडते परंतु त्याची आई डोलोरेस एवेरोने सांगीतले की त्याची आवडती डीश बाकालहाऊ-ब्रेस या मासळीची आहे, जो मीठ, बटाटे, अंडी घालून बनवला जात असून तो एक पारंपारिक पोर्तुगीज पदार्थ आहे.
रोनाल्डोच्या व्हिलामध्ये टेनिस कोर्ट, आउटडोअर पूल, जिम आणि गॅरेज आहे ज्यामध्ये एकावेळी 20 कार पार्क केल्या जाऊ शकतात. रोनाल्डो आणि त्याचे कुटुंब सध्या रियाधमधील फोर सीझन हॉटेलमध्ये एका सूटमध्ये राहत आहेत. रोनाल्डो 22 जानेवारीला सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबमधून पदार्पण करणार आहे.
PSG ला मैत्रीपूर्ण सामन्यातून मिळाले 88 कोटी रुपये
गुरुवारी, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध इलेव्हन (अल नसर आणि अल हिलाल) यांच्यात मैत्रीपूर्ण सामना झाला. रिपोर्ट्सनुसार या मॅचमधून PSG ला 8.8 मिलियन पौंड (सुमारे 88 कोटी रुपये) मिळाले आहेत. या सामन्यात रोनाल्डो आणि लिओनेल मेसी आमनेसामने भिडले. PSG ने अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात रियाध इलेव्हनचा 5-4 असा पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.