आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक कार:केदार जाधव आणि ऋतुराजला मिळाली खास राईड

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या कॅप्टन कूल या इमेजने चर्चेत राहिला आहे. मात्र, सोबतच तो आणखी एका बाबीने चर्चेत राहतो ते म्हणजे त्याचे कार आणि बाईक कलेक्शन. त्याच्याकडे अनेक सुपर-बाईक, व्हिंटेज आणि लक्झरी कार देखील आहेत. त्यात आता या नव्या गाडीची भर पडली आहे. अलीकडेच धोनीने Kia चे नवीन EV6 गाडी विकत घेतली आहे.

धोनीने नुकतीच Kia EV6 खरेदी केली आहे
धोनीने नुकतीच Kia EV6 खरेदी केली आहे

धोनीने आपल्या नव्या कारमधून सीएसकेकडून खेळलेला केदार जाधव आणि युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडसोबत रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. याचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.ही पाच सीटर इलेक्ट्रिक SUV कार आहे. कोरियन कंपनीची KIA कार इलेक्ट्रिक कार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 708 किमी पर्यंत जाऊ शकते. या गाडीची एक्स शोरुम किंमत भारतात जवळपास 60 ते 65 लाख इतकी आहे.

धोनी हा केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाडसोबत रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसला.
धोनी हा केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाडसोबत रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसला.

धोनी आता आयपीएलच्या पुढील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तो सध्या रांचीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. धोनीचे हे शेवटची आयपीएल असणार आहे, असे बोलले जात आहे. मात्र, त्यांनी स्वत: याला दुजोरा दिलेला नाही. धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने सीएसकेसाठी चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.

आपल्या Porsche Boxster मधून बाहेर येताना धोनी.
आपल्या Porsche Boxster मधून बाहेर येताना धोनी.

काय आहे धोनीच्या कलेक्शनमध्ये...

धोनीचे कार कलेक्शन- ‘हमर’ शिवाय धोनीजवळ लग्झरी कार्सचे शानदार कलेक्शन आहे. यात ऑडी Q7, लॅंड रोवर फ्रीलेंडर, GMC Sierra, Ferrari 599, Mitsubishi Outlander, पजेरो SFX, टोयोटा करोला, कस्टम बिल्ट स्कॉर्पियो (ओपन) यासारख्या गाड्या त्याच्या ताफ्यात आहेत.

Ferrari 599 कार धोनीच्या कलेक्शनमधील सर्वात महागडी कारपैकी एक आहे. जी त्याला टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भेट मिळाली होती.
Ferrari 599 कार धोनीच्या कलेक्शनमधील सर्वात महागडी कारपैकी एक आहे. जी त्याला टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भेट मिळाली होती.

धोनीचे बाईक कलेक्शन-धोनीकडे बाईक कलेक्शनमध्ये यामाहाच्या जुन्या मॉडेलसह अनेक लग्झरी बाईक्स आहेत. जसे कॉन्फेडरेट X132 हॅलकेट, कावासाकी निंजा, हार्ले डेविडसन, रॉयल एनफील्ड, डुकाटी 1098 आणि टीवीएस अपाचे आदी गाड्याचे कलेक्शन आहे. धोनीजवळ 11 हून जास्त बाइक्स आहेत.

आपल्या Confederate Hellcat X132 वर बसलेला धोनी. या बाईकची किंमत सुमारे 27 लाख रुपये इतकी आहे.
आपल्या Confederate Hellcat X132 वर बसलेला धोनी. या बाईकची किंमत सुमारे 27 लाख रुपये इतकी आहे.
बातम्या आणखी आहेत...