आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडेजा आणि CSK मध्ये मतभेद:फ्रेंचाइजीने जडेजाला केले इंस्टाग्रामवर अनफॉलो, चाहत्यांनी धरले धोनीला जबाबदार

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवींद्र जडेजा 10 वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग आहे. नुकतेच CSK ने सर जडेजाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले.

याघटनेनंतर लगेचच ही बातमी आली की रवींद्र जडेजाला बरगडीच्या दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर व्हावे लागले, वृत्तानुसार, 4 मे रोजी RCB विरुद्ध झालेल्या सामन्यात जडेजाच्या बरगडीला दुखापत झाली होती.

अधिकृत विधानावर चाहत्यांचा नाहीये विश्वास

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत निवेदनात असे सांगण्यात आले आहे की रवींद्र जडेजा दुखापतीमुळे DCविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात उपलब्ध नव्हता. तो वैद्यकीय निरीक्षणाखाली होता, नंतर त्याला संपूर्ण IPL हंगामातूनच वगळण्यात आले.

जडेजाच्या या स्पर्धेतून अचानक बाहेर पडल्याने अफवांचा बाजार चांगलाच तापला आहे. संघ व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यामुळेच जडेजाने संघ सोडल्याचे चाहत्यांना वाटते.

चेन्नई व्यवस्थापनाने खालच्या पातळीचे राजकारण खेळल्याचा आरोप

चेन्नई संघ व्यवस्थापन आणि धोनीने जडेजासोबत खालच्या पातळीचे राजकारण खेळल्याचे सोशल मीडियावरील ट्विटमध्ये म्हटले आहे. हंगामातील संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याला बळीचा बकरा बनवण्यात आले असून त्याचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले.

त्यानंतर CSK ने त्याला अनफॉलो केले आणि आता त्याला हंगामातून बाहेर काढले. अशा खेळीमुळे एका सर्वोत्तम खेळाडूचा अपमानच केला आहे.

आणखी एका यूजरने लिहिले की, कर्णधारपदावरून हटल्यानंतर जडेजा पूर्वीसारखा दिसत नाही. यानंतर अचानक जडेजाच्या जाण्याच्या बातम्या येत आहेत. यामागे काहीतरी गंभीर नक्कीच घडले आहे.

16 कोटींमध्ये राखून ठेवलेल्या जडेजाची निराशाजनक कामगिरी

हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नईने जडेजाला सर्वाधिक 16 कोटी रुपये देऊन कायम ठेवले. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाने 8 पैकी 6 सामने गमावले. यादरम्यान रवींद्र जडेजाच्या बॅटमधून केवळ 111 धावा आल्या आणि त्याला केवळ 3 विकेट घेता आल्या. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार खराब कामगिरीनंतर जडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारल्यानंतर संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले.

बातम्या आणखी आहेत...