आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्नरचे कौटुंबिक प्रेम:IPL मध्ये दिसले बुटांवर लिहिलेले पत्नी आणि तीन मुलींची नावे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL च्या 16व्या हंगामात DC चे कर्णधार असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या बुटाच्या मागील बाजूस आयव्ही, इंडी आणि इस्ला या तीन मुलींची नावे आणि बाजूला पत्नीचे नाव लिहिलेले आहे. - Divya Marathi
IPL च्या 16व्या हंगामात DC चे कर्णधार असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या बुटाच्या मागील बाजूस आयव्ही, इंडी आणि इस्ला या तीन मुलींची नावे आणि बाजूला पत्नीचे नाव लिहिलेले आहे.

31 मार्चपासून IPL ला सुरुवात झाली आहे. त्याचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. 59 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू कुटुंबापासून दूर राहणार आहेत. मात्र, फ्रँचायझी खेळाडूंना घरासारखे वातावरण देण्याचा प्रयत्न करतात. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही आणण्याची परवानगी आहे. अनेक खेळाडू मुले आणि पत्नींसोबतही येतात.

या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला डेव्हिड वॉर्नरच्या शूजचा फोटो व्हायरल होत आहे. त्याच्या बुटाच्या मागील बाजूस त्याच्या तीन मुलींची नावं, आयव्ही, इंडी आणि इस्ला लिहिली आहेत, तर त्याच्या पत्नीचे नाव, कॅंडीचे नाव बुटाच्या बाजूला लिहिलेले आहे. त्याच्या शूजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वॉर्नर सोशल मीडियावर सक्रिय

वॉर्नर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या मुलींसोबत नाचताना आणि मजा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. त्याच वेळी, वॉर्नरला भारतीय चित्रपटांबद्दलही खूप आकर्षण आहे. कधी तो बॉलीवूड चित्रपटांच्या गाण्यांवर डान्स करताना तर कधी डायलॉग्स बोलत व्हिडिओ शेअर करत असतो.

वॉर्नरने दोन महिन्यांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये तो हुबेहूब शाहरुखसारखा दिसत आहे.
वॉर्नरने दोन महिन्यांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये तो हुबेहूब शाहरुखसारखा दिसत आहे.

पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा झाला होता पराभव

IPL च्या 16व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात त्याला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनऊने दिल्लीविरुद्ध 192 धावांची मजल मारली. काइल मेयर्सने 38 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी दिल्लीची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप दिसत होती. दिल्लीचा संघ केवळ 143 धावा करू शकला. त्यांना 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 48 चेंडूत 56 धावांची खेळी केली.

पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरकडे कर्णधारपद

गेल्या वर्षी 31 डिसेंबरला पंतचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो सध्या विश्रांती घेत आहे. त्याच्या अनुपस्थितीत दिल्लीचे कर्णधारपद वॉर्नरकडे सोपवण्यात आले आहे.