आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द.आफ्रिकेने जिंकला पहिला टी-20 सामना:212 धावांचे आव्हान देवूनही भारताला वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात अपयश, रेसी - मिलरने हिरावला विजय

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाला टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सलग 13 सामने जिंकण्यात अपयश आले आहे. द.आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 7 विकेट्सनी पराभव केला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 बळींच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. ईशानने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या द.आफ्रिकेने 19.1 षटकांतच 3 बळींच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले.

डेव्हीड मिलरने 64 व रेसी वॉन डेर डुसेनने 75 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी तब्बल 131 धावा केल्या.

भारताची ढिसाळ गोलंदाजी, पंतचे दुबळे नेतृत्व

या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण गोलंदाजांचा फ्लॉप शो राहिले. अनुभवी भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 43 धावा दिल्या. तर आवेश खानने 4 षटकांत 35 रन खर्च केले. हर्षल पटेलही बराच महागडा ठरला. त्याने 4 षटकांत 43 रन दिले. प्रथमच कर्णधारपद भूषवणाऱ्या ऋषभ पंतलाही फारशी चमक दाखवता आली नाही. विशेष म्हणजे लेग स्पिनर युझवेंद्र चहल याला अवघी 2 षटके देण्यात आली.

द.आफ्रिकेविरोधातील सलगचा 6 वा पराभव

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधील ही भारताची दक्षिण आफ्रिकेविरोधातील सलगचा सहावा पराभव आहे. यापूर्वी भारताला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर सलग 2 कसोटी व 3 एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. भारताला डुसेनचा झेल सोडणे फारच महागात पडले. त्यावेळी साऊथ आफ्रिकेच्या धावफलकावर 3 विकेटवर 148 धावा होत्या. तर स्वतः डुसेन 30 चेंडूत 29 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. येथून भारताच्या हातून सामना निसटला.

मॅचचे मोमेंट्स

धोकादायक प्रिटोरियसला हर्षलने क्लीन बोल्ड केले

हार्दिक पंड्याच्या 5 व्या षटकात प्रिटोरियसने 3 षटकार खेचले. या ओव्हरमध्ये त्याने 18 धावा वसूल केल्या. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये त्याला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले. प्रिटोरियसने 13 चेंडूत 29 धावा कुटल्या. त्यात त्याने तब्बल 4 षटकार व 1 चौका हाणला.

भूवीच्या स्विंगपुढे आफ्रिकेचा कर्णधार निष्प्रभ

भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. सामन्याच्या तिसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा भुवीचा इनस्विंगर समजू शकला नाही. त्याने ऋषभ पंतच्या हाती झेल सोपवून झेलबाद झाला. डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात हवी होती, पण ती त्यांना मिळवता आली नाही.

तत्पूर्वी, टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघातर्फे ईशान किशनने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरने 36 व कर्णधार ऋषभ पंताने 29 धावा काढून चांगली साथ दिली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकांत अवघ्या 12 चेंडूत 31 धावा कुटल्या.

अय्यरच्या 27 चेंडूत 36 धावा

टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने 27 चेंडूत 36 धावा केल्या. त्याचा विकेट ड्वेन प्रिटोरियसने घेतला. अय्यरने 133.33 च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या.

ईशानची धडाकेबाज फलंदाजी

या सामन्यात ईशानने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 48 चेंडूत 11 चौकार व 3 षटकांच्या बळावर 76 धावा काढल्या. आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे.

पर्नेलने दिला टीम इंडियाला पहिला झटका

पहिल्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाड व इशान किशनमध्ये 38 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली. गायकवाडचा विकेट 6 वर्षांनंतर द.आफ्रिकेकडून पुनरागमन करणाऱ्या वेन पर्नेलने घेतला. ऋतुराजने 15 चेंडूत 23 धावा केल्या. त्याने 3 तगडे षटकार मारले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत - ऋषभ पंत (कर्णधार), ऋषभ गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, टेंबा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, तबरीझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या, मार्को येन्सन.

बातम्या आणखी आहेत...