आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाच्या टी-20 संघात बदल होण्याची शक्यता आहे. सीनियर खेळाडू टी-20 संघाबाहेर असू शकतात. BCCI च्या एका सूत्राने सांगितले- 'पुढील एका वर्षात टी-20 संघात बरेच बदल होतील. रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि आर अश्विनसारखे खेळाडू हळूहळू बाहेर होतील.
BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, 'वर्ल्ड कप पाहुन असे वाटते की, कार्तिक आणि अश्विनचा टी-२० फॉरमॅटमधील शेवटचा सामना सेमीफायनल होता. दुसरीकडे, रोहित आणि कोहलीचे भवितव्य ठरवण्याचे काम बोर्डाने त्यांच्यावर सोडले आहे.
दरम्यान, BCCI ने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह संपूर्ण कोचिंग स्टाफला न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांतीवर पाठवले आहे. या दौऱ्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक असतील.
पुढील 24 महिन्यांत T-20 संघातील बदलांवर BCCI सूत्रांचे काय म्हणणे आहे ते पाहुया…..
इंग्लंडच्या पराभवानंतर उपस्थित काही प्रश्न आणि बोर्डाची कारवाई
1. रोहित लवकरच T-20 मधून निवृत्ती जाहीर करेल का?
हे शक्य आहे, कारण उपांत्य फेरीतील पराभवानंतर तो खूप उदास दिसत होता. त्याला प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांभाळले. सामन्यानंतर मीडियासमोर सुद्धा द्रविड सामोरे गेला, रोहित शर्मा नाही.
BCCI च्या सूत्राने असेही सांगितले की, बोर्डाने कोणालाही निवृत्ती घेण्यास सांगितले नाही. तो खेळाडूचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो. पण, 2023 मध्ये पुढील 24 महिन्यांतील T20 चे वेळापत्रक खूप व्यस्त आहे.
यादरम्यान, बहुतेक वरिष्ठ खेळाडू वनडे आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करतील. जर खेळाडूंना वाटत नसेल तर ते निवृत्तीची घोषणा करणार नाहीत. पण हो, बहुतेक सिनीयर खेळाडू पुढील वर्षी टी-20 खेळताना दिसणार नाहीत.
2. हार्दिक पंड्याला T-20 चे कर्णधारपद मिळणार?
उपांत्य फेरी नंतर बोर्ड आणि संघाशी संबंधित लोकांवर विश्वास ठेवला तर दोन वर्षांनंतर जून 2024 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाबाबत बदल होऊ शकतो. हार्दिक पंड्या हा बोर्डासमोर नवा पर्याय आहे. नवीन संघासोबत दीर्घकाळ कर्णधारपदासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो.
3. रोहित-विराटबद्दल मुख्य प्रशिक्षक द्रविडचे काय म्हणणे आहे?
या प्रश्नावर राहुल द्रविड म्हणाला की उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर लगेचच याबद्दल बोलणे घाईचे ठरेल. हे खेळाडू आमचे सर्वोत्तम परफॉर्मर आहेत. आमच्याकडे काही महान खेळाडू आहेत. खेळाडूंना वगळण्याचा विचार करण्याची किंवा त्याबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही. आमच्या पुढे बरेच सामने आहेत. टीम इंडिया पुढील विश्वचषकाची तयारी करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.