आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Defending Champions Madhya Pradesh Beat Two time Champions Vidarbha, Madhya Pradesh Won By 205 Runs At Home.

रणजी करंडक:गतविजेत्या मध्य प्रदेशची दाेन वेळच्या चॅम्पियन विदर्भावर मात, मध्य प्रदेश घरच्या मैदानावर 205 धावांनी विजयी

इंदूर /मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामनावीर आवेश खानने घेतल्या एकूण १२ विकेट

युवा कर्णधार आदित्य श्रीवास्तवच्या नेतृत्वात गत चॅम्पियन मध्य प्रदेश संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी माेहिम कायम ठेवली. यासह यजमान मध्य प्रदेश संघाने शुक्रवारी आपल्या घरच्या मैदानावर दाेन वेळच्या चॅम्पियन विदर्भ टीमचा पराभव केला. मध्य प्रदेश संघाने २०५ धावांनी सामना जिंकला. संघाच्या विजयात सामनावीर आवेश खानचे माेलाचे याेगदान ठरले. त्याने सामन्यात एकूण १२ बळी घेतले. विजयाच्या ४०७ धावांच्या प्रत्युुत्तरात विदर्भ संघाला २०१ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. कर्णधार फझलने (६५) एकाकी झुंज दिली मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार खेळीने विदर्भाला पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई, महाराष्ट्र संघांचे सामने ड्राॅ; केदार ठरला सामनावीर कर्णधार अंकितच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबई संघांचे रंगतदार सामने शुक्रवारी अनिर्णित राहिले. महाराष्ट्र आणि आसाम यांच्यातील सामना ड्रा झाला. यादरम्यान द्विशतक साजरे करणारा केदार जाधव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने दमदार पुनरागमन करताना २८३ चेंडूंत २८३ धावांची माेठी खेळी केली. तसेच मुंबई आणि तामिळनाडू संघातील सामना ड्रा झाला. यादरम्यान सरफराज हा सामनावीर ठरला. चाैथ्या दिवशी कर्णधार बाबा इंद्रजीत आणि प्रदाेष रंजन पाॅलने माेठी खेळी केली. यात रंजनने १६९ आणि विजय शंकरने १०३ धावा काढल्या. २१२ धावांचा पाठलाग करताना मुंबईने दुसऱ्या डावात ३ बाद १३७ धावा करत सामना ड्राॅ केला.

बातम्या आणखी आहेत...