आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Dhaeni's Annual Income Is Eight Billion; He Has Invested Heavily In Hockey, Football, Racing And Gym

धोनी कमाईत निवृत्तीनंतरही राहणार सुपरकिंग:धाेनीचे वार्षिक उत्पन्न आठ अब्ज ; हाॅकी, फुटबाॅल, रेसिंग, जिममध्ये केली माेठी गुंतवणूक

एकनाथ पाठक । औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाहिरात विश्वात बाॅलीवूड अभिनेता शाहरुखनंतर धाेनी दुसऱ्या स्थानी
  • फुटबाॅल, हाॅकी, रेसिंगमध्ये संघ खरेदीत गुंतवणूक करणारा एकमेव

माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने कुशल नेतृत्व, आक्रमक फलंदाजी आणि अचाट यष्टिरक्षकाच्या भूमिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी आेळख निर्माण केली. कुशल नेतृत्वातून ताे जगातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नावारूपास आला. त्याला सुपरकिंग मानले जाते. भारतीय संघाला जागतिक स्तरावर क्रिकेटमध्ये उंची गाठून देणाऱ्या धाेनीने निवृत्ती जाहीर केली. ताे आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. निवृत्तीनंतरही ताे कमाईमध्ये सुपरकिंग राहणार आहे. काेट्यवधींची गुंतवणूक त्याने करून ठेवली आहे. क्रिकेटपाठाेपाठच त्याने हाॅकी, फुटबाॅल, रेसिंग, एंटरटेनमेंट, फॅशन क्षेत्रात ठसा उमटवला आहे. टीम खरेदी करून ताे युवांच्या गुणवत्तेला चालना देत आहे.

जाहिरात विश्वात बाॅलीवूड अभिनेता शाहरुखनंतर धाेनी दुसऱ्या स्थानी

> जाहिरातचा किंग : आक्रमक खेळीबराेबर जाहिरात विश्वातही त्याने गुणवत्ता सिद्ध केली. त्यामुळे २० जाहिरात कंपन्यांशी ताे करारबद्ध आहे. यातून २०० काेटींची ताे कमाई करताे. शाहरुखपाठाेपाठ ताे यात दुसऱ्या स्थानी आहे.

> हॉकी : हाॅकीपटूंच्या गुणवत्तेला चालना मिळावी यासाठी धाेनीने प्राेफेशनल हाॅकी लीगमध्ये संघ खरेदी केला. रांची रेज नावाने असलेला धाेनीचा संघ या लीगमध्ये खेळताेे. यासाठी त्याने जवळपास ३५० काेटींची गुंतवणूक केलेली आहे.

> फॅशन : ‘लाइफस्टाइल ब्रँड सेव्हन’मध्ये धाेनीने फॅशनच्या विश्वातही नाव कमावले. ताे या ब्रँडचा मालक आहे. चार वर्षांपासून या क्षेत्रात ताे प्रगती साधत आहे.

> 200 जिम : देशभरातील चाहत्यांना फिटनेसबाबतचे धडे देण्यासाठीही धाेनीने पुढाकार घेतला. यातून त्याने देशभरात ‘स्पोर्ट्स फिट’ या नावाने जिम सुरू केले. त्यांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. मुंबईसह माेठ्या शहरात हे सुरू आहेत.

> एफसीची किक : आयपीएलमध्ये अव्वल खेळी करताना धाेनीने फुटबाॅल खेळातील आपली आवड कायम ठेवली. त्याने आयएसएलमध्ये चेन्नई एफसी संघ खरेदी केला. सहमालक म्हणून त्याने यात ३०० काेटींची गुंतवणूक केली.

> सुसाट प्रगती : बाइकचे धाेनीचे प्रेम जगजाहीर आहे. हा छंद जपताना त्याने रेसिंगमध्ये २०० काेटींची टीम खरेदी केली. यात नागार्जुनसह सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप टीमचा तो सहमालक आहे.

> स्पेशल फोकस : माजी कर्णधार धाेनीने एंटरटेनमेंटमध्येही वेगळे काम करण्याचे ठरवले. यातून त्याने धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लि. नावाची कंपनी सुरू केली. यातून त्याने हाॅस्टस्टारसाेबतचा आपला पहिला प्राेजेक्ट यशस्वी केला. यासाठी त्याची ४०० काेटींची गुंतवणूक असल्याचे दिसते.

> ८ अब्ज ३५ काेटींची वार्षिक कमाई

> १५ काेटी मिळतात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून

> २०० काेटी जाहिरातींमधून

> २० जाहिरात कंपन्यांशी करार

बातम्या आणखी आहेत...