आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिखर धवनच्या कुशल नेतृत्वाखाली टीम इंडिया विंडीजपाठाेपाठ आता झिम्बाव्वे दाैरा करणार आहे. येत्या १८ ऑगस्टपासून भारत व यजमान झिम्बाव्वे यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. या मालिकेसाठी शनिवारी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात आली. या संघामध्ये वेगवान गाेलंदाज दीपक चहर, राहुल त्रिपाठीला संधी देण्यात आली. विंडीज दाैऱ्यावरील वनडे मालिका विजयाने पुन्हा एकदा धवनकडे नेतृत्व साेपवण्यात आले. यादरम्यान नियमित कर्णधार राेहित शर्मासह माजी कर्णधार विराट काेहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली.
संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहंमद सिराज, दीपक चहर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.