आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ॲनालिसिस:धोनीचा होता युवांवर विश्वास; काेहलीच्या नेतृत्वात प्रगती, मात्र सेटलची संधी मिळेना

मुंबई / चंद्रेश नारायणनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दीड दशकादरम्यान भारतीय संघाच्या नेतृत्वात फक्त दोन वेळाच खांदेपालट करण्यात आला. त्यामुळे सुदैवाने संघाच्या नेतृत्वाची धुरा एकाकडेच फार काळ कायम राहिली. यातूनच टीमला यशाचा मोठा पल्ला गाठता आला. आता कोहलीने विश्वचषकानंतर टी-२० चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या नेतृत्वाची चर्चा रंगत आहे.

२००७ मध्ये राहुल द्रविडने नेतृत्व साेडल्यानंतर महेंद्रसिंग धाेनीने यशस्वी कर्णधाराची भूमिका पार पाडली. वनडेत नेतृत्व करतानाच धोनीने टी-२० मध्येही आपली वेगळी छाप पाडली. सीनियर खेळाडूंनी नकार दिल्यानंतर धाेनीने आपल्या युवांच्या लक्षवेधी कामगिरीतून टी-२० विश्वचषक जिंकून दाखवण्याचा पराक्रम गाजवला. त्याच्या नेतृत्वात टीमने वनडे, कसाेटी आणि टी-२० या तिन्ही फाॅरमॅटमध्ये अल्पावधीतच यशाची वेगळी उंची गाठली. २००८ मध्ये कसाेटी संघाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत त्याने टीमच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. यातूनच टीमला जगातील नंबर वन कसाेटी संघ हाेण्याचा बहुमान मिळाला. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने २०११ मध्ये विश्वचषक जिंंकला. त्याने आपल्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेसह कुशल नेतृत्वाचा गुणही कायम ठेवला. यातून त्याच्या नेतृत्वात संघातील युवा आणि सीनियर खेळाडूंत खास समन्वय साधला जात हाेता. मात्र, २०१४ नंतर यात माेठा बदल झाला. काेहलीच्या नेतृत्वात संघाने यश संपादन केले. मात्र, खेळाडूंच्या मनात असुरक्षित असल्याची भीती वेगाने वाढत गेली. २०१७ मध्ये काेहलीकडे वनडेसह टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी साेपवण्यात आली.

विश्वविजेता हाेण्याचे धाेनीचे एकच लक्ष्य; घेतले सकारात्मक निर्णय
प्रचंड आत्मविश्वास आणि शांत स्वभावाच्या बळावर धाेनीने संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. अशक्य असलेल्या अनेक सामन्यांत मॅच विनरची भुूमिका सहज बजावत त्याने खेळाडूंमध्ये विजयासाठीचा विश्वास निर्माण केला. याचा निश्चित असा माेठा बदल संघातील युवा खेळाडूंमध्ये झाला. याच युवा खेळाडूंच्या बळावर त्याने टी-२० मध्ये वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. विश्वविजेता हाेण्याचे लक्ष्य समाेर ठेवून त्याने खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यावर अधिक भर दिला. यासाठी त्याला यादरम्यान अनेक सकारात्मक असे निर्णयही घ्यावे लागले. यातूनच त्याने सचिन, सेहवाग, जहीर आणि हरभजनसारख्या सीनियरसाेबतच तत्कालीन युवा काेहली आणि राेहितलाही वेळाेवेळी संधी दिली. यातून युवा खेळाडूंची एक सक्षम अशी फळी तयार झाली. यासाठी त्याने खेळाडूंमध्ये याेग्य प्रकारचा समन्वय ठेवला. त्यामुळे सीनियरची मर्जी सांभाळतच त्याने युवांना वेळाेवेळी संधी दिली. अपयशाची जबाबदारी स्वत: घेत त्याने विजयाचे श्रेय युवांना दिले. यातून युवांना विजय मिळवण्यासाठीची सवय लागली. २०१२ मध्ये घरच्या मैदानावरील इंग्लंडविरुद्ध मालिका पराभवानंतर धाेनीला प्रचंड टीकेला सामाेरे जावे लागले. मात्र, त्याने आपला संयम कायम ठेवला. याकडे दुर्लक्ष करत त्याने संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. यातूनच संघाने अल्पावधीत माेठे यश मिळवले. यादरम्यान त्याने आपल्या कुशल नेतृत्वातून जगातील नंबर वन यशस्वी कर्णधार हाेण्याचाही बहुमान पटकावला. याशिवाय त्याच्या नेतृत्वात खेळताना खेळाडूंनाही माेठी प्रगती साधता आली. त्यानंतर चॅम्पियन्स ट्राॅफीत त्याने संघाला यश मिळवून दिले. २०१४ मध्ये त्याने कसाेटीतून निवृत्ती जाहीर केली.

रहाणे-राेहितच्या नेतृत्वात खेळाडू मैदानावर खुश
काेहलीच्या नेतृत्वात अॅडिलेडमध्ये टीमचा ३६ धावांत धुव्वा उडाला. त्यानंतर टीमच्या नेतृत्वाची धुरा अजिंंक्य रहाणेकडे साेपवण्यात आली. त्याने कुशल नेतृत्वातून टीमला मालिका विजय मिळवून दिला. तसेच राेहितनेही नेतृत्वाच्या जबाबदारीला सार्थकी लावताना टीम इंडियाला २०१८ मध्ये आशिया कप आणि निदाहास ट्राॅफी जिंकून दिली हाेती. या दाेघांच्या नेतृत्वात संघातील खेळाडूंमध्ये माेकळे वातावरण असते. काेणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय खेळाडू १०० टक्के देण्यावर अधिक भर देतात.

काेहलीच्या नेतृत्वात वेगवान गाेलंदाजांची फळी; मात्र, सेटल हाेण्याची संधी मिळेना
काेहलीकडे २०१४-१५ मध्ये आॅस्ट्रेलिया दाैऱ्यावर असताना कसाेटी संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली. धाेनी आणि काेहली या दाेघांच्या विचारात माेठी तफावत हाेती. यातूनच काेहलीने आपापल्या विचार पद्धतीतून संघाची बांधणी केली. त्याने वेगवान गाेलंदाजांची वेगळी फळी तयार करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे संघात वेगवान गाेलंदाजांना माेठी संधी मिळत गेली. यातून टीमने विजयाचा पल्ला गाठण्याची मालिका कायम ठेवली. त्यानंतर तीन वर्षांत त्याच्याकडे २०१७ मध्ये वनडे संघाचे कर्णधारपद आले. यातून त्याने आपलाच फाॅर्म्युला वापरला. मात्र, असे असताना त्याने काेणत्याही वेगवान गाेलंदाज आणि युवा फलंदाजांना सेटल हाेऊ दिले नाही. यातूनच संघातील खेळाडूंच्या मनात असुरक्षितपणाची भीती वाढत गेली. २०१९ विश्वचषकापूर्वी काेहलीने अनेक फलंदाजांना चाैथ्या स्थानावरून खेळण्याची संधी दिली. मात्र, कुणालाही कायमस्वरूपी या स्थानी ठेवले नाही.

बातम्या आणखी आहेत...