आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑरमेक्स मीडियाचा अहवाल:धोनी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू; अव्वल दहात रोनाल्डो, मेसीदेखील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनी ने लोकप्रियतेच्या बाबतीत कर्णधार विराट कोहलीला मागे सोडले
  • यंदा ट्विटरवर सर्वाधिक धोनी चर्चात राहिला

देशात ७ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद आहे. यादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याने लोकप्रियतेमध्ये कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. भारतीय माध्यम सल्लागार कंपनी ऑरमेक्स मीडियाच्या अहवालानुसार जुलैमध्ये अव्वल १० सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये ७ क्रिकेटपटू आहेत तर, जूनमध्ये ५ क्रिकेटर होते. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू अव्वल १० मधून बाहेर झाल्या. फुटबॉलपटू रोनाल्डो व मेसी अव्वल दहामध्ये आहेत. टेनिस स्टार सानिया मिर्झाचादेखील समावेश आहे. धोनी यंदा ट्विटरवरदेखील सर्वाधिक चर्चात राहिला आहे.

जुलैमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू

क्रम खेळाडू

१. महेंद्रसिंग धोनी

२. विराट कोहली

३. सचिन तेंडुलकर

४. रोहित शर्मा

५. क्रिस्टियानो रोनाल्डो

६. सानिया मिर्झा

७. लियोनेल मेसी

८. युवराज सिंग

९. सौरव गांगुली

१०. हार्दिक पंड्या

जुलैमधील अव्वल ठरले हे हॅशटॅग

7.8% #msdhoni

3.9% #dhoni

3.5% #master

2.7% #sachinmaidencentury

2.7% #csk

हे शब्द जुलैमध्ये सर्वाधिक शोधले गेले

17.8% धोनी

11.2% थाला

10.9% एमएसडी

3.1% माही

2.7% पोझिशन

बातम्या आणखी आहेत...