आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज 2023 वर्षाचा पहिला दिवस. प्रत्येकाने आपापल्या परीने नवीन वर्षाचे स्वागत केले. यामध्ये टीम इंडियाचे स्टार्सही मागे राहिले नाहीत. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी दुबईत आपापल्या पत्नींसोबत नववर्ष साजरे केले. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्नीसह मालदीवमध्ये पोहोचला. गेल्या आठवड्यात श्रीलंका दौऱ्यासाठी टी-20 संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेला हार्दिक पंड्याही या जल्लोषात मागे राहिला नाही. त्याने पत्नीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
या स्टोरीमध्ये तुम्हाला क्रीडा जगतातील स्टार्सच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबद्दल माहिती मिळेल... सर्वप्रथम दुबईला जाऊ या... जिथे धोनी-कोहलीने आपापल्या पत्नींसोबत नवीन वर्ष साजरे केले...
साक्षीने पोस्ट केला आतषबाजीने भरलेला व्हिडिओ
धोनीने दुबईतील पाम हॉटेलमध्ये नवीन वर्ष साजरे केले. साक्षीने रविवारी सकाळी 'ताऱ्यांनी भरलेले आकाश' असा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये धोनी आपली मुलगी जिवासोबत रात्रीच्या आकाशात फटाक्यांची आतषबाजीचा आनंद लूटताना दिसत आहे.
'विरुष्का'ने शेअर केला फोटो
T-20 मधून ब्रेकवर असलेल्या विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विराटसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. विराटसोबत त्याचे भावंडेही दुबईत आहेत. कोहली 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेचा भाग नाही. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेद्वारे तो क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे.
पंड्याने पोस्ट केला हॉटेलमधील एक फोटो
T20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने श्रीलंका दौऱ्यासाठी पत्नी संजना गणेशनसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो हॉटेलमधील पार्टीपूर्वीचा आहे.
सूर्यकुमार यादव 2023 च्या पहिल्या दिवशी पोहोचला सिद्धिविनायक मंदिरात
भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव वर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. त्याने श्रीगणेशाचे आशीर्वाद घेतले. सिद्धी विनायकला पोहोचल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या वर्षी तो वनडे संघातही दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.