आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Diamond League Final: Neeraj Chopra Becomes First Indian To Win Diamond Trophy, Neeraj Chopra Makes History Watch Video: Becomes First Indian To Win Diamond League Final; Won The Gold Medal By Throwing 88.44 Meters

नीरज चोप्राने रचला इतिहास पाहा व्हिडिओ:डायमंड लीग फायनल जिंकणारा ठरला पहिला भारतीय; 88.44 मी. थ्रो करून जिंकले​​​​​​​ सुवर्ण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने पहिल्यांदाच डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये त्याने 88.44 च्या ब्रेस्ट थ्रोसह पहिले स्थान पटकावले.

याआधी नीरजने 2017 आणि 2018 मध्येही फायनलसाठी तो पात्र झाला होता. त्यात 2017 मध्ये तो सातव्या आणि 2018 मध्ये चौथा होता.

वाईट सुरुवात

नीरजची सुरुवातच खराब झाली, त्याचा पहिला थ्रो हा फाऊल होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर फेक करून त्याने इतर भालाफेकपटूंवर आघाडी घेतली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर फेकले.

नीरजचा पहिला थ्रो फाऊल होता, तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.
नीरजचा पहिला थ्रो फाऊल होता, तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.

जॅकब वाडलेच राहिला दुसऱ्या क्रमांकावर

झेक प्रजासत्ताकचा जॅकोब वाडलेच 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर (83.73) तिसरा आला. याआधी नीरजने 2021 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक, 2018 मध्ये आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे, तर यावर्षी जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले आहे.

नीरज चोप्राने यावर्षी जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले.
नीरज चोप्राने यावर्षी जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले.

दुखापत होऊनही मानली नाही हार

नीरज चोप्राला जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो सहभागी झाला नव्हता. आता त्याने पुनरागमन केले असून डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पोहोचणारा भारताचा एकमेव खेळाडू ठरला.

यापूर्वी डिस्कस थ्रोमध्ये, विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये प्रवेश करणारा एकमेव भारतीय ठरला. तसे, नीरज चोप्राच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर आहे. हे त्याने स्टॉकहोम डायमंड लीग 2022 मध्ये केले होते.

बातम्या आणखी आहेत...