आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीसीसीआय आयपीएलच्या पुढील सत्राचा विस्तार करण्यावर काम करत आहे. जर टीम वाढल्यास त्यात अहमदाबादची टीम निश्चित असू शकते. त्याचबरोबर एक आणखी टीम वाढल्यास कानपूर किंवा लखनऊ किंवा पुणे यापैकी एक असू शकते. बीसीसीआय आयपीएलच्या विस्तावर डिसेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीत निर्णय घेईल. अहवालानुसार, गौतम अदानीच्या मालकीचा अदानी ग्रुप आणि संजीव गोयंकाच्या आरपीएसजी ग्रुप संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत पुढे आहे. अदानी ग्रुप अहमदाबादची फ्रँचायझी घेऊ शकतो. दुसरीकडे, गोयंका ग्रुप यापूर्वी आयपीएलचा सदस्य राहिला आहे. त्यांनी रायझिंग पुणे सुपरजाएंट्सला दोन वर्षांसाठी खरेदी केले होते. या दोघांसह दक्षिण भारतातील आघाडीचा अभिनेता मोहनलालने दक्षिणेतील मोठ्या उद्योग समूहासोबत मिळून फ्रँचायझी घेण्यात रुची दाखवली. तो नुकताच मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्सच्या किताबी सामन्यादरम्यान दुबईत बीसीसीआय ऑफिशियल्ससोबत दिसला. मात्र, बीसीसीआयने नव्या संघाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. जर बीसीसीआय आपल्या योजनेला पुढे न्यायची असेल तर त्यांना मोठी लिलाव प्रक्रिया घेण्याची तयारी करावी लागेल. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, बीसीसीआयने फ्रँचायझींना सूचना केली आहे की, नवी टीम आणि लिलावाबद्दल डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात माहिती दिली जाईल. सूत्रांनुसार, चेन्नई, राजस्थान रॉयल्स, पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा लिलाव हवा आहे.
बीसीसीआयने एमिरेट्सला दिले १०० कोटी रुपये :
बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनासाठी यूएईच्या एमिरेट्स क्रिकेट मंडळाला १०० कोटी रुपये दिले. आयपीएलचे सामने दुबई, शारजा व अबुधाबीमध्ये खेळवले गेले होते. या निधीमुळे यूएईला आर्थिक साहाय्य मिळेल. आयपीएलमुळे यूएईमध्ये पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रात वाढ झाली. तेथील १४ फाइव्ह स्टार हॉटेल तीन महिन्यांपर्यंत भरलेले होते. आता नव्या नियमानुसार, राज्य संंघटनेला एका आयपीएल सामन्याच्या आयोजनासाठी एक कोटी रुपये मिळतील. बीसीसीआयने नुकतीच फ्रँचायझींच्या आयोजन शुल्कात वाढ केली होती. प्रत्येक सामना आयोजन शुल्क ३० लाखांवरून ५० लाख रुपये करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.