आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Shrilanka Cricket Match | DK, Ashwin's Strong Case Against Sri Lanka, Match Today At 7.30 PM

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात डीके, अश्विन यांची दावेदारी भक्कम, आज सायंकाळी 7.30 वाजता सामना

चंद्रेश नारायणन | मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशिक्षक द्रविड, कर्णधार रोहित शर्मा सामन्यात अधिक प्रयोग टाळतील

टीम इंडिया अजूनही पाकिस्तानविरुद्धच्या पराभवातून सावरत असतानाच मंगळवारी त्यांना श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. रविवारी पाकविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात भारतीय संघाने अनेक चुका केल्या. आता श्रीलंकेविरुद्ध संघाला आपल्या मर्यादित गोलंदाजांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. याशिवाय प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित यांना अति प्रयोग टाळावे लागतील. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत संघाकडे गोलंदाजीत फारसा पर्याय नाही. हीच संघाची सर्वात मोठी कमजोरी आहे. तीच पाकिस्तानविरुद्ध पाहायला मिळाली. मागील सामन्यात आवेश खान आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. या सामन्यात तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंनी केल्या होत्या तीन मोठ्या चुका 1. फक्त चार गोलंदाजांसह मैदानात उतरले | ही पहिली चूक निवड समितीची झाली. सपाट खेळपट्टीवर केवळ चार गोलंदाजांसह खेळणे चुकीचे आहे. संघ चार गोलंदाज आणि हार्दिक पांड्यासह मैदानावर उतरला. पांड्या आणि युझवेंद्र चहल हे दोघेही महागडे ठरू लागले तेव्हा पाकची फलंदाजी रोखण्यासाठी भारताकडे पर्याय नव्हता. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना विकेट घेता आली नाही. गडी मिळवण्याची संधी निर्माण होत असतानाही संघाला त्याचा फायदा घेता आला नाही.

2. हुड्डाचा वापर केला नाही त्यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो दीपक हुड्डाचा. त्याची निवड का झाली? त्याची भूमिका काय होती? याचा विचार केला नाही. मोहम्मद नवाजने मैदानात चौफेर फटकेबाजी सुरू केली तेव्हा कर्णधाराने हुड्डाला गोलंदाजी द्यायला हवी होती. परिणामी, भारताची गोलंदाजी मर्यादित झाली आणि पाकच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली.

3. अश्विन इलेव्हनमध्ये नाही हुड्डा प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड हा चर्चेचा विषय बनला आहे. कर्णधाराने योग्य वेळी त्याचा वापर केला नाही तर संघ अश्विनसोबतही जाऊ शकतो. त्याचा अनुभव संघासाठी नेहमीच उपयोगी पडतो आणि तो जगातील कोणत्याही फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. शिवाय अश्विन चांगली फलंदाजी करतो. उपयुक्त षटकेही टाकताे. चहल फॉर्ममध्ये नसताना मिडल ओव्हर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताला विश्वासार्ह दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची गरज आहे. अश्विनच्या गोलंदाजीची संघाला नितांत गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...