आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये पाहुण्या संघाचा कर्णधार हनुमा विहारीने (२७) बुधवारी हात तुटल्यानंतरही फलंदाजी करण्यात मैदानात उतरला. इतका त्रास होता की, उजव्या हाताच्या फलंदाजाला डावखुरी फलंदाजी करावी लागली, मात्र त्याने अखेरपर्यंत मैदान सोडले नाही. झाले असे की, बुधवारी रणजीमध्ये आंध्र व मध्य प्रदेश यांच्यातील क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा विहारी ३७ चेंडूंत १६ धावांवर खेळत होता, तेव्हा आवेश खानचा बाउन्सर सोडताना त्याच्या उजव्या हाताच्या तळव्याला दुखापत झाली. यानंतर विहारीला मैदान सोडावे लागले. माहितीनुसार, स्कॅननंतर विहारीला डॉक्टरांनी ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला होता, परंतु त्याचा संघ २ बाद ३२३ धावांवरून ९ बाद ३५३ धावांवर ढेपाळला होता, ते पाहून विहारी पुन्हा मैदानात आला होता. दिवसअखेर मध्य प्रदेशने ४ बाद १४४ धावा काढल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.