आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Doubles Kohli's Runs In Last 2 Months, Surpassing Modest Performance In 20 Months After 2021; Most Runs In World Cup Too

कोहली 2.0:2021 नंतर 20 महिन्यांतील सुमार कामगिरीला मागे टाकत गत 2 महिन्यांत काेहलीच्या दुपटीने धावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेला माजी कर्णधार विराट काेहली आता मैदानाबराेबरच आयसीसीच्या पुरस्कारातही आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आयसीसीच्या प्लेअर आॅफ द मंथ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच महिला गटामध्ये मुंबईच्या जेमिमा राॅड्रिग्जसह दीप्ती शर्माच्या नावाची शिफारस करण्यात आली. गत तीन वर्षांतील सुमार कामगिरीतून सावरलेल्या काेहलीने गत दाेन महिन्यात दुपटीने धावा काढल्या. यासह ताे टी-२० वर्ल्डकपमध्ये टाॅप-स्काेअरर आहे. त्याचा नवा २.० अवतार दिसून येत आहे.

अडचणीचा काळ सरासरीत घसरण; शतकातही अपयशी { २३ नाेव्हेंबर २०१९ राेजी आपल्या ७० व्या शतकानंतर काेहलीला ७१ व्या शतकासाठी तब्बल १०२१ दिवसांपर्यंत दीर्घ मेहनत करावी लागली. यादरम्यानचा तीन वर्षांचा प्रवास हा त्याच्यासाठी अधिकच खडतर ठरला. त्यानंतर त्याला आता कमबॅक करता आले आहे. { नाेव्हेंबर २०१९ पर्यंत ५७ च्या सरासरीने धावा काढणाऱ्या काेहलीची सध्या सरासरीत ३७ पर्यंत घसरण झाली आहे. { पदार्पणानंतर तब्ब्ल ११ वर्षांपर्यंत सर्वाधिक धावा काढणारा काेहली तीन वर्षांपासून टाॅप-५ स्काेअररमधूनही बाहेर आहे. मात्र, आता त्याने माेठी प्रगती साधली आहे. { १ जानेवारी २०२२ पासून आॅगस्ट २०२२ पर्यंत काेहलीने क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये २५ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. {गत आयपीएलच्या सत्रात काेहलीने १६ सामन्यांमध्ये ११५ च्या स्ट्राइक रेटने ३४१ धावा काढल्या. यादरम्यान ताे अपयशी ठरला. यादरम्यान त्याच्या नावे फक्त दाेन अर्धशतकांची नाेंद झाली.

चाहते आणि माजी खेळाडूंकडून टीका; कामगिरीवर प्रश्नचिन्ह विराट काेहलीला सुमार खेळीमुळे गत तीन वर्षांंत सर्वाधिक वेळा चाहते आणि माजी खेळाडूंच्या टीकेला सामाेरे जावे लागले. अनेकांनी त्याच्या घसरत चाललेल्या स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच अनेकांनी त्याला निवृत्तीचेही सल्ले दिले हाेते.मात्र, आता त्याने सर्वाेत्तम खेळीतून या सर्वांना चाेख प्रत्युत्तर दिले आहे.

पुनरागमन आशिया कपमधील शतकाने फाॅर्मात { काेहलीने आशिया कपच्या माध्यमातून दमदार पुनरागमन केले. या स्पर्धेत टीम इंडियाला झटपट पॅकअप करावे लागले. मात्र, यादरम्यान काेहलीने पाच सामन्यांमध्ये २७६ धावा काढल्या. ताे स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने ८ सप्टेंबर २०२२ मध्ये ३ वर्षांनंतर शतक केले. { काेहलीने आंतरराष्ट्रीय ७१ वे शतक साजरे करत आपण पुन्हा नव्या उमेदीने आणि दमाने पुनरागमन करत असल्याचे संकेत दिले {काेहलीने आशिया कप आणि त्यानंतरच्या दाेन महिन्यांमध्ये ६२४ धावा काढल्या आहेत. { आपल्या ओवरऑल टी-२० करिअरमध्ये १३८ च्या स्ट्राइक रेटने खेळणारा विराट काेहली आजच्या घडीला १४२ च्या स्ट्राइक रेटने खेळत आहे. यातून त्याला दमदार पुनरागमन करण्याची संधी मिळाली. {रेकाॅर्ड हाेल्डर काेहली टी-२० विश्वचषकातील २३ डावात सर्वाधिक १०६५ काढणारा फलंदाज ठरला.

टाॅप-१०० स्काेअररमधून बाहेर असलेला काेहली दाेन महिन्यांत सर्वाेत्कृष्ट विराट काेहलीने १ जानेवारी २०२१ ते २० आॅगस्ट २०२२ पर्यंत टी-२० फाॅरमॅटमधील १२ डावात ३८० धावा काढल्या हाेत्या. यासह ताे जगातील टाॅप-१०० स्काेअररमध्येही नव्हता. मात्र, गत दाेन महिन्यांत त्याचे पुनरागमन हे लक्षवेधी ठरले. त्याने आशिया कपनंतर दाेन महिन्यांत टी-२० च्या १४ डावांत ६२४ धावा काढल्या. यासह त्याने ७८ च्या स्ट्राइक रेटने झंझावाती खेळी करताना प्रतिस्पर्धीची गाेलंदाजी फाेडून काढली. यासह ताे आता जगातील सर्वाेत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. त्याने आता आपल्या तुफानी खेळीतून दमदार पुनरागमन केल्याचे सिद्ध केले आहे.

विश्वचषकात टाॅप स्काेअरर, चार डावांत ३ अर्धशतके, ३ वेळा नाबाद सध्या विराट काेहली हा आॅस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक स्पर्धा गाजवत आहे. यासह ताे सध्या वर्ल्डकपमध्ये टाॅप स्काेअरर फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याच्या नावे चार डावांत ३ अर्धशतकांची नाेंद आहे. यातील तीन डावांत त्याने नाबाद खेळी केली. त्याने २२२ च्या सरासरी आणि १४४.७३ च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या आहेत. यामुळेच ताे दाेन वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सध्या स्पर्धेत त्याची सरासरी ८८.७५ आहे. त्यामुळेच सध्या त्याचा स्पर्धेत दबदबा निर्माण झाला आहे. यातून त्याला अर्धशतकेही साजरी करता आली.

बातम्या आणखी आहेत...