आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या नियमात बदल:डीआरएस प्रथमच टी-20 विश्वचषकात लागू; दोन रिव्ह्यू प्रत्येक डावात, अडीच मिनिटांचा असेल ब्रेक

दुबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीसीने स्पर्धांसाठी जाहीर केली नियमावली

पावसाचा व्यत्यय : उपांंत्य व अंतिम सामन्यात १० षटकांनंतर डकवर्थ-लुईस नियमाने निकाल आयसीसीने टी-२० विश्वचषकासाठी खेळण्याचे नियम जाहीर केले. प्रथमच टी-२० विश्वचषकात डिसीजन रिव्ह्यू सिस्टिमचा (डीआरएस) वापर होईल. आयसीसीने ही पद्धत वापरण्यास परवानगी दिली. प्रत्येक डावात दोन्ही संघाला २-२ रिव्ह्यू मिळतील. म्हणजेच, दोन्ही संघांच्या कर्णधाराला डावादरम्यान दोन वेळा मैदानावरील अम्पायरच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार असेल.

आयसीसीच्या गव्हर्निंग काैन्सिलने गतवर्षी जूनमध्ये कोरोनादरम्यान अनेक सामन्यांत अनुभवी पंचांची गैरहजेरी पाहता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत एक अतिरिक्त रिव्ह्यू वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टी-२० आणि एकदिवसीयच्या एका डावात प्रत्येक संघाला दोन आणि कसोटीच्या प्रत्येक डावात दोन्ही संघाला रिव्ह्यूच्या ३ संधी दिल्या जात आहेत. त्याचबरोबर, आयसीसीने उशिरा किंवा पावसामुळे अडथळा निर्माण झालेल्या सामन्यातील षटकांची संख्या वाढवण्याच्या निर्णय घेतला. साखळी फेरीदरम्यान संघाला कमीत कमी ५ षटके फलंदाजी करावी लागेल, तेव्हाच निकालासाठी डकवर्थ-लुईस नियमाचा वापर केला जाईल.

हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू असेल. मात्र, टी-२० विश्वचषकातील उपांत्य व अंतिम सामना बाधित झाल्यास, षटकांची मर्यादा वाढवून १० केली जाईल. असे गतवर्षी महिला टी-२० विश्वचषकादरम्यान केले होते. मात्र, इंग्लंड आणि भारत यांच्यात सिडनी येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पावसामुळे वाया गेल्यावर या नियमाबद्दल बरीच चर्चा झाली, कारण राखीव दिवसाअभावी इंग्लंड स्पर्धेबाहेर झाला होता. आयसीसीने कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएसचा प्रथम वापर वेस्ट इंडिजमधील २०१८ च्या महिला टी-२० विश्वचषकात केला होता. तेव्हा संघाकडे रिव्ह्यू घेण्याचा एक पर्याय होता.

बक्षीस ४२ कोटी रुपये, चॅम्पियनला १२ कोटी
स्पर्धेचे बक्षीस ५.६ मिलियन डॉलर (जवळपास ४२ कोटी रुपये) आहे, जे सहभागी १६ संघांमध्ये वितरित होईल. विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर (जवळपास १२ कोटी रुपये) मिळतील. उपविजेत्याला ६ कोटी दिले जातील. उपांत्य फेरीत पराभूत संघाला ३-३ कोटी देण्यात येईल. आयसीसी सुपर-१२ च्या प्रत्येक विजयावर बोनस देखील देणार आहे. असे २०१६ मध्ये देखील केले होते. या स्तरावरील एकूण ३० सामन्यांत जवळपास ९ कोटी रुपये बक्षीस वाटप केले जाईल. आयसीसीने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक ठेवण्याचा निर्णय घेतला. अडीच मिनिटांचा हा ब्रेक अर्धा डाव संपल्यावर घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...