आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:चेंडूची शिलाई हाताने; अशात चकाकीसाठी घाम ठरेल पुरेसा, ड्यूक कंपनीची माहिती

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडसह अनेक देशांत ड्यूक चेंडू कसोटीसाठी वापरला जातो

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आयसीसी चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या उपयोगावर बंदी आणू शकते. अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. यादरम्यान ड्यूक या चेंडू बनवणाऱ्या कंपनीने म्हटले की, लाळेच्या उपयोगावर बंदी आणली तरी चेंडूवर त्याचा परिणाम होणार नाही. चेंडूची शिलाई हाताने केली जाते. अशात चेंडूला घामाने चकाकी देता येऊ शकते. इंग्लंडसह अनेक देशांत ड्यूक चेंडू कसोटीसाठी वापरला जातो. कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात इंग्लंडपासून होणार आहे. ८ ऑगस्टपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदरम्यान कसोटी मालिका सुरू होईल. 

ड्यूकचे मालक दिलीप जाजोदिया यांनी म्हटले की, इंग्लंडमध्ये स्विंगची अडचण राहणार नाही. त्यांनी म्हटले की, खेळातील रोमांच कायम ठेवण्यासाठी चेंडू व बॅटमधील ताळमेळ गरजेचा आहे. चेंडूची शिलाई हाताने केली जाते, त्यामुळे ती दीर्घकाळ कायम राहते. जरी गोलंदाज थुंकीचा उपयोग करू शकणार नाही. मात्र त्याला घामाने चेंडू चमकवण्याची परवानगी आहे. कुकाबुरा चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ बनवतेय. मात्र, ड्यूक कंपनीने म्हटले की, नैसर्गिक गोष्टीचा वापर केला पाहिजे. क्रिस वोक्सने म्हटले होते की, देशात स्विंगसाठी मदत करणारा ड्यूक चेंडू वापरला जातो.

बातम्या आणखी आहेत...