आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • During The Corona, England Will Play 12 International Matches At Just 2 Grounds In 56 Days; Fight Against Three Teams

क्रिकेट:कोरोनादरम्यान इंग्लंड संघ 56 दिवसांत फक्त 2 मैदानांवर खेळणार 12 आंतरराष्ट्रीय सामने; तीन संघांविरुद्ध देणार झुंज

साउथम्प्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडचे आयर्लंड संघाविरुद्ध 3 वनडे, पाकसोबत 3 कसोटी व 3 टी-20 सामने

इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला अाज बुधवारपासून सुरुवात होत आहे. चार महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्याला सुरुवात होत आहे. मात्र, चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश बंदी आहे. सुरक्षेमुळे केवळ दोन ठिकाणी साउथम्प्टन व मँचेस्टरमध्ये सामने खेळवले जातील. दोन्ही ठिकाणी मैदानाबाहेर हॉटेल आहेत. खेळाडूंना अधिक प्रवास करावा लागू नये, यासाठी येथे सामने होतील. संघाला आयर्लंड विरुद्ध ३ वनडे आणि पाकिस्तान विरुद्ध ३ कसोटी व तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या मैदानावर दोन्ही संघ पहिल्यांदा कसोटीत समाेरासमाेर; इंग्लंडचे येथे ३ पैकी दाेन विजय रोस बाउल मैदानावर इंग्लंड व वेस्ट इंडीज पहिल्यांदा कसोटी सामना खेळतील. इंग्लंडने आतापर्यंत येथे तीन कसोटी खेळल्या. दोनमध्ये विजय मिळला तर, एक बरोबरी सुटली. नाणेफेक महत्त्वाची असेल, कारण दोन दिवस फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. अशात नाणेफेक जिंकणारी टीम प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकते.

विंडीज टीम १९८८ पासून इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यात ठरतेय अपयशी

विंडीज संघाचे इंग्लंडमध्ये कसोटीत गेल्या काही वर्षांपासून चांगले प्रदर्शन राहिले नाही. संघ १९८८ पासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकला नाही. १९८८ नंतर विंडीजने इंग्लंडमध्ये ८ कसोटी मालिका खेळल्या. ६ मालिकेत त्यांचा पराभव झाला तर, दोन मालिका बरोबरीत सुटल्या. अखेरच्या १६ सामन्यात संघाचा १३ वेळा पराभव झाला, केवळ एका सामन्यात विजय मिळाला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विंडीजला अद्याप एकही गुण नाही.

स्टोक्स इंग्लंडचा ८१ वा कसोटी कर्णधार बनेल; सलामीच्या कसाेटीला मुकणार!

मालिकेतील पहिल्या सामन्यात बेन स्टोक्स नेतृत्व करेल. नियमित कर्णधार जो रुट पिता बनल्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणार नाही. स्टोक्स इंग्लंडचा ८१ वा कसोटी कर्णधार बनेल. १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सामन्यासाठी कोरोना राखीव खेळाडूचा नियम बनवला आहे. म्हणजे, एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर, त्याच्या जागी दुसरा खेळाडू अंतिम ११ मध्ये खेळेल.

ब्रायन लाराची टीका: वेस्ट इंडीज संघामध्ये पाच दिवस खेळण्याची क्षमता नाही

विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने म्हटले की, आमच्या संघाला सामना चार दिवसांचा अाहे, असे समजून खेळायला हवे. कारण आमच्या खेळाडूंमध्ये पाच दिवस खेळण्याची क्षमता नाही. ५१ वर्षीय लाराने म्हटले, वेस्ट इंडीजकडे मजबूत गोलंदाजी आक्रमण आहे, मात्र फलंदाजीची चिंता वाटते. इंग्लंडला त्यांच्या मैदानावर हरवणे सोपे नाही. त्यांना इंग्लंडवर दबदबा बनवावा लागेल, मला वाटत नाही, ते पाच दिवस टिकतील. त्यामुळे त्यांना या सामन्यांना चार दिवसांप्रमाणे खेळावे लागेल. त्यांनी आघाडी घेतली असेल आणि कायम ठेवावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...