आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या इतिहासात प्रथमच मीडिया हक्कांसाठी ई-लिलाव होणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता बोली सुरू होऊन ती दोन दिवस चालू शकते. बीसीसीआयने २०२३-२०२७ पर्यंत मीडिया हक्कांसाठी ३२,८९० कोटी रुपये बेस प्राइस ठेवली आहे. टीव्ही हक्कांची बेस प्राइस ४९ कोटी रुपये प्रति सामना तर डिजिटल हक्क प्रति सामना ३३ कोटी आहेत. ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार,यावेळी बोली ६० हजार कोटींपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच प्रतिसामन्याचे मूल्य १०० कोटींपेक्षा जास्त असेल. असे झाल्यास ते जगातील सर्वात महागड्या राष्ट्रीय फुटबॉल लीगनंतर (NFL) दुसऱ्या क्रमांकावर येईल. NFL चे प्रतिसामना मूल्य सुमारे १३५ कोटी रुपये आहे. आहे. स्टार इंडियाने गेल्यावेळी २०१८ ते २०२२ पर्यंतचे मीडिया हक्क १६,३४८ कोटींत घेतले होते. प्रत्येक सामन्याचे सरासरी मूल्य सुमारे ६६ कोटी होते.
कोण घेणार कॅच, मोठा प्रश्न
जगातील टॉप-५ स्पोर्ट््स लीगमध्ये आयपीएल सध्या चौथ्या क्रमांकावर, प्रति सामना मूल्य ६६ कोटी
लीग प्रति सामना मूल्य एकूण कमाई
नॅशनल फुटबॉल लीग 135.14 1.24 लाख
मेजर लीग बेसबॉल 81.97 77,818
नॅशनल बास्केटबॉल असो. 74.50 62,260
इंडियन प्रीमियर लीग 66.17 54,492
इंग्लिश प्रीमियर लीग 30.05 28,024
(सर्व आकडे कोटींमध्ये)
खडतर स्पर्धा... १० कंपन्या रिंगणात
बीसीसीआय सूत्राने सांगितले, अॅमेझॉन शर्यतीतून बाहेर गेली आहे. गुगलने कागदपत्रे सादर केली नाहीत. अशा परिस्थितीत रिलायन्स, वॉल्ट डिस्ने, झी आणि सोनी यांच्यात चुरस आहे. इतर कंपन्यांत ड्रीम ११, टाइम्स इंटरनेट, फनएशिया, फनकोड, स्काई स्पोर्टस व सुपरस्पोर्टचा समावेश आहे.
स्पोर्ट्स मीडिया राइट्स तज्ज्ञ आशिष चढ्ढा म्हणाले, “प्रति सामन्यात टीव्ही हक्कांत २०-२५% नफा होण्याची अपेक्षा नाही, परंतु डिजिटल हक्कांच्या पॅकेजमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. आमच्या अंदाजानुसार, एकत्रित मूल्य ११५-१२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
वर्षभरातील ४१० सामन्यांच्या लिलावासाठी चार पॅकेज, तिसऱ्यात चुरस, कारण प्लेऑफ-फायनल सामन्याचे हक्क त्यांच्याकडे असतील
-कधी, किती सामन्यांच्या हक्कांचा लिलाव?
२०२३ ते २०२७ मध्ये पाच आयपीएल हंगामाच्या दरम्यान पहिल्या तीन मध्ये ७४-७४ आणि शेवटच्या दोन हंगामातील ९४-९४ सामन्यांच्या प्रसारण हक्कांचे लिलाव केले जातील.
-बोलीतील हे ४ प्रकारचे पॅकेज कोणते?
पहिले- भारतीय उपखंडातील टीव्ही हक्कांसाठी प्रति सामना ४९ कोटी रुपये. बेस प्राइस १८.१३० कोटी. दुसरे- भारतीय उपखंडातील डिजिटल हक्कांसाठी प्रतिसामना ३३ कोटी रुपये. बेस प्राइस १२,२१० कोटी. तिसरे- १८ सामने व नॉन एकस्क्ल्युसिव्ह डिजिटल पँकेजसाठी प्रतिसामना ११ कोटी. बेस प्राइस ९९० कोटी. चौथे - परदेशात टीव्ही व डिजिटल हक्कांंसाठी ३ कोटी प्रतिसामना तर बेस प्राइस १,११० कोटी.
- एक कंपनी सर्व हक्कांसाठी बोली लावू शकते का?
नाही, प्रत्येक पॅकेज सर्वाधिक बोली लावणाऱ्याला दिले जाईल. उदा. २०१७ मध्ये फेसबुकने डिजिटल हक्कांसाठी ३,९०० कोटी रुपये बोली लावली होती. तर स्टारची बोली कमी होती. तरीही सर्व अधिकार स्टारला देण्यात आले.
-कोणत्या पॅकेजसाठी क्लोज क्लॅश शक्य?
तिसऱ्या पॅकेजमधील १८ सामन्यांमध्ये सलामीचा सामना, अंतिम सामना, तीन प्लेऑफ आणि संध्याकाळच्या दोन डबल-हेडर सामन्यांचा समावेश आहे. सर्व मोठ्या कंपन्यांत चुरस असेल.
-मोठी भूमिका कोणाची असू शकते?
२०१७ च्या लिलावात स्टारकडून लिलाव जिंकणारे उदय शंकर यावेळी रिलायन्ससोबत आहे. रिलायन्सने या कराराच्या आधी बोधी ट्री सिस्टीमशी करार केला आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स मजबूत स्थितीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.