आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाची कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंची संख्यावाढीसाठी विशेष माेहीम

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 काउंटी संघांत 118 कर्मचाऱ्यांत फक्त 2 कृष्णवर्णीय
  • वर्णभेद करणाऱ्यावर कारवाई करा : हाेल्डर
  • २५ वर्षांत कृष्णवर्णीयांच्या संख्येत झाली ७५ टक्के घसरण

ज्या प्रकारे डोपिंग व फिक्सिंगमध्ये सहभागी खेळाडूंवर कार्यवाही करण्यात येते त्याचप्रमाणे वर्णभेदी टीका करणाऱ्या खेळाडूंवरदेखील व्हायला हवी, अशा शब्दात वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने वर्णभेद करणाऱ्यावर टीका केली.

आयसीसीच्या अँटी रेसिज्म कोडमध्ये मैदानात तीन वेळा वर्णभेदी टीका केल्यानंतर आजीवन बंदीचा प्रस्ताव आहे. यादरम्यान इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) कृष्णवर्णीय क्रिकेटपटूची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच अभियान सुरू करणार आहे. देशात गेल्या २५ वर्षांत कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंची संख्या ७५ टक्के कमी झाली आहे.

ईसीबीसोबत काम करत असलेल्या अफ्रिकन कॅरेबियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीसीए) याप्रकरणी कृष्णवर्णीयांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

१९९० पासून कृष्णवर्णीय खेळाडूंना जाणीवपूर्वक बाहेर केले जात आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ईसीबीमध्ये कोणी कृष्णवर्णीय प्रशासक नाही. एवढेच नाही तर, काउंटी संघाचे मुख्य संचालक किंवा अध्यक्षपदी देखील एकही कृष्णवर्णीय नाही. आम्ही संस्कृतीशी जोडलेलो आहोत आणि खेळावर प्रेम देखील करतो. त्यावर ईसीबीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, कृष्णवर्णीय खेळाडूंबाबत काही अडचणी अद्यापही आहेत. त्यामुळे काहीच कृष्णवर्णीय क्रिकेट खेळू शकतात. त्यात बदल करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया एसीसीएचे अध्यक्ष व सरेचे माजी खेळाडू लोंसडेले स्किनर यांनी दिली.

वेगवान गाेलंदाज जोफ्रा बार्बाडाेस येथे खेळून इंग्लंड संघात दाखल इंग्लंड कसोटी संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ईसीबीच्या माध्यमातून संघात आला नाही. तो मूळचा बार्बाडोसचा आहे. त्याचे वडील इंग्लिश होते. आर्चर २०१५ मध्ये इंग्लंडला गेला. मात्र, नियमानुसार २०२२ पर्यंत इंग्लंडकडून खेळू शकत नव्हता. नोव्हेंबर २०१८ मध्ये ईसीबीच्या नियमात बदल झाला आणि आर्चर इंग्लंड संघात खेळण्यास पात्र ठरला. ३ मे २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.कृष्णवर्णीय खेळाडूंना जाणीवपूर्वक बाहेर केले गेले : स्किनर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. माझ्या मते, कृष्णवर्णीयांना जाणीवपूर्वक बाहेर करण्यात आले आणि ईसीबीने त्याबाबत काही करू शकले नाही. रग्बीमध्ये ५-६ खेळाडू असू शकतात, तर क्रिकेटमध्ये का नाही. म्हणजे काही तरी गडबड आहे. ईसीबीने म्हटले की, आम्ही मान्य करतो की, क्रिकेटमध्ये कृष्णवर्णीय खेळाडू कमी असण्यामागे काही अडचणी आहेत. त्याबाबत लवकरात लवकर माहिती आवश्यक आहे. आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. गेल्या वर्षी काउंटी अकादमी क्रिकेटर्स १५ व १८ वर्षांखालील खेळाडूंना स्थान देतात, ज्यात २३ टक्के खेळाडू कृष्णवर्णीय, आशिया व अल्पसंख्याक समाजाचे होते. त्यासह आधुनिक स्तर तीनच्या प्रशिक्षणांत देखील त्याचा भाग १५ टक्के आहे, असे स्किनर म्हणाले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...