आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुटचे नाबाद शतक:इंग्लंडची सात वर्षांनंतर न्यूझीलंडवर मात, पाच गड्यांनी विजयी; येत्या 10 जूनपासून निर्णायक दुसरी कसोटी

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर ज्यो रुट (नाबाद ११५) आणि कर्णधार स्टोक्सने (५४) यजमान इंग्लंड संघाला आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. इंग्लंड टीमने पाच गड्यांनी विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २७७ धावांचे लक्ष्य यजमान इंग्लंड टीमने दुसऱ्या डावात ७८.५ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वीपणे गाठले. सलामीच्या कसोटीत पहिला डाव गुंडाळणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २८५ धावांची खेळी केली. दरम्यान इंग्लंडने दुसऱ्या डावात पाच बाद २७९ धावा काढून विजयाची नाेंद केली. इंग्लंडकडून युवा गाेलंदाज मॅथ्यूने आंतरराष्ट्रीय कसोटीचा आपला पदार्पणाचा सामना गाजवला. त्याने या पदार्पणाच्या कसोटीत सात बळी घेतले. यात पहिल्या डावातील चार आणि दुसऱ्या डावातील तीन बळींचा समावेश आहे.

यासह इंग्लंड संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसऱ्या आणि निर्णायक कसोटीला १० जुनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड संघाने तब्बल सात वर्षे आणि सात डावांनंतर न्यूझीलंडविरुद्ध विजय संपादन केला. यापूर्वी इंग्लंड संघाने २१ मे २०१५ मध्ये एेतिहासिक लाॅर्ड्््स मैदानावर न्यूझीलंडचा पराभव केला होता. तसेच इंग्लंड टीमचा ओव्हरआॅल न्यूझीलंडविरुद्धचा हा ४९ वा विजय ठरला. आतापर्यंत दोन्ही संघांत १०८ कसोटी सामने झाले. आता यजमान इंग्लंडने चौथ्या दिवशी पाच बाद २१६ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. यासह त्याने आपल्या नावे २६ व्या कसोटी शतकाची नाेंद केली. कर्णधार स्टोक्सने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

रुट १४ वा फलंदाज : ज्यो रुटने नाबाद शतकासह आपल्या कसोटी करिअरमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठला. त्याच्या नावे आता ११३ डावात ४९.५७ च्या सरासरीने १ हजार १५ धावांची नाेंद झाली. यामध्ये २६ शतकांसह ५३ अर्धशतकांचा समावेश आहे. हे यश मिळवणारा रुट जगातील १४ वा फलंदाज ठरला.

बातम्या आणखी आहेत...