आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद:जोस बटलरच्या सर्वोच्च खेळीने इंग्लंड संघाची मालिकेत आघाडी; भारतावर 8 गड्यांनी मात

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडची मालिकेत २-१ ने अाघाडी; उद्या चाैथा सामना

सामनावीर जाेस बटलरने अापल्या टी-२० करिअमरधील सर्वाेच्च ८३ धावांची खेळी करून इंग्लंड संघाला मंगळवारी भारतविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. इंग्लंड संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ गड्यांनी मात केली. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने अाघाडी घेतली. अाता मालिलेतील चाैथा सामना उद्या गुरुवारी याच मैदानावर हाेणार अाहे. काेहलीच्या (७७) नाबाद खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १८.२ षटकांत दणदणीत विजय संपादन केला. बटलर अाणि बेयरस्ट्राेने अभेद्य अर्धशतकी भागीदारीतून एकहाती विजय साकारला.

प्रथम फलंंदाजीत भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर राेहित शर्मा (१५), लाेकेश राहुल अाणि ईशान किशन (४) झटपट बाद झाले. भारतीय संघाने २४ धावांसाठी तीन विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार विराट काेहलीने संघाचा डाव सावरला. त्याने नाबाद ७७ धावा काढल्या.

  • इंग्लंडच्या जाेस बटलरने टी-२० करिअरमध्ये सर्वाेच्च खेळी केली. त्याने ७७ व्या सामन्यात ८३ नाबाद धावा काढल्या. यासह त्याला या फाॅरमॅटमध्ये १२ वे अर्धशतक साजरे करता अाले. त्याने ५२ चेंडूंत ५ चाैकार व ४ षटकारांसह नाबाद ८३ धावा काढल्या.
  • टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने मालिकेत सलग दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७७ धावांची खेळी केली.
  • काेहलीने अापल्या करिअरमधील २७ वे अर्धशतक नाेंद केले. त्याने ४६ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकार व ४ उत्तंुग षटकारांच्या अाधारे नाबाद ७७ धावा काढल्या.
  • टीम इंडियाचा युवा फलंदाज लाेकेश राहुलचा फाॅर्मात येण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ताे चार डावात तिसऱ्यांदा भाेपळाही न फाेडता पॅव्हेलियनमध्ये परतला.

बातम्या आणखी आहेत...