आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाेस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ तब्बल दशकाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर टी-२० मध्ये विश्वविजेता हाेण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी इंग्लंड संघाला कर्णधार बाबर आझमच्या पाकिस्तान टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. रविवारी हे दाेन्ही संघ ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर समाेरासमाेर असतील. २०१० मधील चॅम्पियन इंग्लंड संघाने उपांत्य फेरीत भारतावर मात केली आणि फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला. इंग्लंड संघाने तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे पाकिस्तान संघाला फायनल गाठता आली. पाकने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात केली. त्यामुळे पाकला फायनलमधील प्रवेश निश्चित करता आला. इंग्लंड संघाने २०१० आणि पाक संघाने २००९ मध्ये विश्वविजेता हाेण्याचा बहुमान मिळवला हाेता. आता या दाेन्ही संघांना पुन्हा एकदा चॅम्पियन हाेण्याची संधी आहे.
एमसीजीच्या पिचवर इंग्लंडसमाेर पाकच्या वेगवान गाेलंदाजांचे असेल तगडे आव्हान मेलबर्नमधील खेळपट्टी वेगवान गाेलंदाजांसाठी मदतगार मानली जाते. सध्या पाकिस्तान संघाचे वेगवान गाेलंदाज फाॅर्मात आहे. त्यामुळे बटलरच्या इंग्लंड संघासमाेर शाहिन आफ्रिदी, हॅरिस, नसीम शाहसारख्या गाेलंदाजांचे तगडे आव्हान असेल. यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना सावध खेळी करावी लागणार आहे. इंग्लंडने उपांत्य सामना १० गड्यांनी जिंकला. मात्र, आता इंग्लंडच्या फलंदाजांसमाेर वेगवान गाेलंदाजीचा माेठा अडसर असणार आहे.
इंग्लंडचे एकमेव पाकिस्तान टीमविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक १७ विजय नाेंद इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत टी-२० फाॅरमॅटचे २८ सामने झाले आहेत. यादरम्यान इंग्लंड संघाने सरस खेळीतून १७ सामन्यांमध्ये विजयाची नाेंद केली. यासह इंग्लंडला टी-२० मध्ये पाकविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. यादरम्यान पाकला फक्त ९ सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध विजय साजरा करता आला आहे. पाकने घरच्या मैदानावरील ७ टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ४-३ ने धूळ चारली हाेती.
अंतिम सामन्यात तुल्यबळ झुंज; नेतृत्व सिद्ध करण्याचे माेठे आव्हान नेतृत्व : इंग्लंड टीमचा जाेस बटलर आणि पाकिस्तानचा बाबर आझम हे दाेघेही कर्णधाराच्या भुमिकेमध्ये प्रथमच समाेरासमाेर असतील. बाबर आझम सध्या संथ फलंदाजीमुळे चर्चेत आहे. त्याच्या कामगिरीवर टीका हाेत आहे. दुसरीकडे बटलरला माॅर्गनच्या जागी झालेली निवड याेग्य ठरवण्याचा दबाव आहे. त्यामुळे या दाेन्ही कर्णधारांसमाेर नेतृत्व सिद्ध करण्याचे माेठे आव्हान आहे. फलंदाजी : पाकिस्तान संघाची सलामीची जाेडी सातत्याने अपयशी ठरत आहे. दुसरीकडे सलामीच्या जाेडीने इंग्लंड संघाला भारताविरुद्ध १० गड्यांनी विजय मिळवून दिला. त्यामुळेच पाक संघ प्रचंड दबावात आहे. पाकसमाेर आता हेल्स व बटलरला राेखण्याचे आव्हान असेले. गाेलंदाजी : पाक हा वेगवान गाेलंदाजीमुळे मजबूत मानला जाताे. सध्या टीमचा युवा वेगवान गाेलंदाज शाहिन आफ्रिदी फाॅर्मात आहे. दुसरीकडे इंग्लंड संघाचा सॅम कॅरेनही चांगली खेळी करत आहे.
अष्टपैलू : इंग्लंड संघामध्ये अष्टपैलू खेळी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळेच इंग्लंड संघ यादरम्यान वरचढ ठरू शकेल. सॅम, माेईन अली, स्टाेक्स, लिव्हिंगस्टाेन यांच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. दुसरीकडे पाक टीममध्ये ऑलराउंडरचा अभाव आहे.
१९९२ मध्ये एमसीजीवर रंगली हाेती झुंज; पाक ठरला चॅम्पियन मेलबर्नच्या मैदानावर १९९२ मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात वनडे वर्ल्डकपची फायनल झाली हाेती. यादरम्यान पाकिस्तान संघ सरस ठरला हाेता. या संघाने फायनलमध्ये इंग्लंडवर मात करून किताब जिंकला हाेता. त्यामुळे आता याच विजयाला पुन्हा उजाळा देण्याचा पाकिस्तान संघाचा मानस आहे. या मैदानावर सध्या पावसाचे सावट आहे. यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची तरतुद केली आहे. मात्र, तरीही या ठिकाणी सलग दाेन दिवस रविवारी-साेमवारी पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे अखेर पावसाच्या व्यत्ययाने या दाेन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपदावर समाधान मानावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.