आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विक्रम:इंग्लंडने 13 तासांत दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळत नवा विक्रम रचला; आधी वनडे, नंतर कसोटीत उतरला संघ

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसोटी : पाकिस्तान : बुधवारी दुपारी ३.३० वा. सुरू; वनडे : आयर्लंड : मंगळवारी रात्री २.२० वा. संपला

इंग्लंडने बुधवारी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरताच नवा विक्रम रचला. टीमने १३ तासांत दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळले. हा नवा विक्रम आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री २.२० वाजता इंग्लंड व आयर्लंड यांच्यात तिसरा वनडे समाप्त झाला. आयर्लंडने ४९.५ षटकांत ३ बाद ३२९ धावा काढत सामना जिंकला. त्यानंतर बुधवारी दुपारी ३.३० वाजता इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला. यापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने १५ तासांच्या आत टी-२० व कसोटी सामना खेळला होता. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना दिवसअखेर पाकिस्तानने ४९ षटकांत २ बाद १३९ धावा काढल्या. शान मसूद ४६* धावा व बाबर आझम ६९* धावांवर खेळत आहे. अबिद अली १६ व कर्णधार अजहर अली शून्यावर बाद झाला. जोफ्रा आर्चर व क्रिस वोक्सने प्रत्येकी १-१ बळी घेतला. पावसामुळे दिवसाचा संपूर्ण खेळ हाेऊ शकला नाही.