आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • England Tour Of Pakistan; Pakistan VS England, Babar Azam, Mohammad Rizwan, Moeen Ali, Dawid Malan, Alex Hales, England Win Home To Pakistan After 17 Years, 1st T20 Match Won By 6 Wickets, Hales Brook's Winning Knock

17 वर्षांनंतर पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर इंग्लंडचा विजय:पहिला टी-20 सामना 6 विकेट्सने जिंकला, हेल्स-ब्रूकची विजयी खेळी

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डावखुरा मध्यमगती गोलंदाज ल्यूक वुडची अचूक गोलंदाजी आणि एलेक्स हेल्स आणि हॅरी ब्रूक यांच्या शानदार खेळीमुळे इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्यात विजयाने सुरुवात केली. त्यांनी यजमान टीमचा 6 गडी राखून पराभव केला.

इंग्लिश संघाने 17 वर्षांनंतर पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. या संघाने 2005 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. 7 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने 19.2 षटकात 4 विकेट गमावून 159 धावांचे लक्ष्य गाठले.

3 वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या एलेक्स हेल्सने 53 धावा, तर हॅरी ब्रूकने (नाबाद 42) शानदार खेळी केली.

सुरूवातीला टास हारल्यानंतर पाकिस्तान संघाने फलंदाजी करत 158 धावा केल्या. त्यांचा सलामीवीर रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. मात्र, बाबरला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही आणि 24 चेंडूत 31 धावा करून तो तंबूत परतला. तर मोहम्मद रिझवानने 46 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या.

पाकच्या मधल्या फळीची निराशाजनक कामगिरी

पाकिस्तानने पहिल्या 10 षटकात 87 धावा केल्या होत्या, पण पाकच्या मधल्या फळीला झालेल्या दमदार सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. हैदर अलीने 11 (13) धावा, तर टी-20 पदार्पण करणाऱ्या शान मसूदने सात चेंडूंमध्ये तेवढ्याच धावा जोडल्या.

मोहम्मद नवाजही चार धावा करून तंबूत परतला, इफ्तिखार अहमदने 17 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 28 धावा करून संघाला 20 षटकांत 158/7 अशी मजल मारली.

मोहम्मद रिझवानने 68, तर कर्णधार बाबर आझमने 31 धावा केल्या.
मोहम्मद रिझवानने 68, तर कर्णधार बाबर आझमने 31 धावा केल्या.

इंग्लंडकडून ल्यूक वुडने चार षटकांत 24 धावांत 3 बळी घेतले, तर आदिल राशीदने दोन आणि सॅम कुरन आणि मोईन अलीला प्रत्येकी एक बळी मिळाला.

हेल्स-मालन यांनी इंग्लंडचा डाव सावरला

लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्यात सलामीवीर फिलिप सॉल्टची (10) विकेट लवकर पडली, पण त्याच्यासोबत सलामीला आलेला हेल्स एका टोकाला टिकून राहिला. हेल्सने मलानसोबत दुसऱ्या विकेटसाठी 34 आणि डकेटसोबत तिसऱ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली.

चौथ्या विकेटसाठी ब्रुक आणि हेल्स यांच्यातील 55 धावांच्या भागीदारीने पाकिस्तानला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले. ब्रूक्सने 25 चेंडूंत सात चौकारांसह 42 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात विजयी चौकाराचा समावेश होता.

ब्रूक्सने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 4 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
ब्रूक्सने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 4 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानकडून कादिरने चार षटकांत 36 धावांत दोन बळी घेतले, तर शाहनवाझ दहानी आणि हरिस राउफ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नसीम शाहने चार षटकांत 41 धावा दिल्या, तर त्याला एकही बळी घेता आला नाही.

बातम्या आणखी आहेत...