आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना संकटाला दुर सारत विंडीज संघाने रविवारी इंग्लंड दाैऱ्यात विजयी पताका फडकवली. विंडीजने सलामी कसाेटीत यजमान इंग्लंडवर चार गड्यांनी मात केली. इंग्लंडने विजयासाठी दिलेले २०० धावांचे लक्ष्य विंडीजने सहा गड्यांच्या माेबदल्यात गाठले. विजयात ब्लॅकवूडने (९५) माेलाचे याेगदान दिले. चेसने (३७) व डावरिचने (३७) चांगली खेळी केली. कसाेटीत ९ बळी घेणारा गाब्रियल सामनावीरचा मानकरी ठरला.
यासह विंडीजने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरी कसाेटी आता १६ जुलैपासून मंॅचेस्टर येथे रंगणार आहे. या संकटाच्या काळातही विंडीज संघाने उल्लेखनीय कामगिरी करताना चाहत्यांना आनंदाची पर्वणीच दिली. याच महामारीमध्ये सध्या यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील सलामीची कसाेटी चांगलीच रंगात आली आहे. या दाेन्ही संघांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सध्या ही कसाेटी राेमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. यजमान इंग्लंडने दुसऱ्या डावात पुनरागमन करताना ३१३ धावांची खेळी केली. पहिल्यापासून फाॅर्मात असलेल्या विंडीजसमाेर विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. विंडीजने पाचव्या आणि शेवटच्या दिवशी हे लक्ष्य गाठून मालिकेत विजयी सलामी दिली.
११७ दिवसांनंतरच्या सामन्यात विजय लक्षवेधी
काेराेनाच्या संकटामुळे मागील ११७ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुर्णपणे बंद हाेते. याला १० जुलै राेजी इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील कसाेटीने सुरुवात झाली. त्यामुळे आता १३ मार्चनंतर प्रथम झालेल्या या सामन्यातील विंडीजचा विजय हा अधिक चर्चेचा आणि लक्षवेधी ठरला. विंडीजने सलामीला सरस गाेलंदाजी आणि फलंदाजी करताना विजयाची नाेंद केली. यासह टीमने मालिकेत आघाडी घेतली.
२०० वा त्यापेक्षा कमी धावांचे लक्ष्य गाठताना विंडीजने आतापर्यंत ६० पैकी ५५ सामन्यांत विजय संपादन केले. यातील पाच सामने अनिर्णित राहिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.