आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • England Vs West Indies Second Test Updates | Sibley, England's 469 By Stakes Century; Five Victims Of The Windies Chase

दुसरी कसोटी:सिब्ले, स्टाेक्सच्या शतकाने इंग्लंडच्या ४६९ धावा; विंडीजच्या चेसचे पाच बळी

मँचेस्टर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिब्लेच्या 120 धावा; बेन स्टोक्सचेही (176) संथ गतीने शतक झाले साजरे

सलामीवीर डॉम सिब्ले (१२०) आणि बेन स्टोक्स (१७६) यांनी घरच्या मैदानावर शतकी खेळीच्या बळावर यजमान इंग्लंडने शुक्रवारी विंडीज संघाविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत ९ बाद ४६९ धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. प्रत्युुत्तरात विंडीज संघाने १ गड्याच्या माेबदल्यात ३२ धावा काढल्या. ४३७ धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजकडे अद्याप ९ विकेट शिल्लक आहेत.

इंग्लंडचा सलामीवीर सिब्लेने शानदार शतकी खेळी केली. त्याने १२० धावा काढल्या. यासह ताे आता २० वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर संथ गतीने शतक ठाेकणारा पहिला फलंदाज ठरला. स्टाेक्सनेही हाच पराक्रम गाजवला आहे. विंडीजकडून राेस्टन चेसने पाच, राेचने दाेन, हाेल्डर व जाेसेफने प्रत्येकी एक विकेट घेतली.

इंग्लंडचा धावांचा डाेंगर

सलामीच्या पराभवातून सावरताना यजमान इंग्लंड संघाने दुसऱ्या कसाेटीत दमदार खेळी केली. यातून इंग्लंडने दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात धावांचा डाेंगर उभा केला. यजमानांनी ९ बाद ४६९ धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. यात सिब्ले (१२०) आणि स्टाेक्सच्या (१७६) प्रत्येकी एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय जाेस बटलरने ४० आणि बेसच्या नाबाद ३१ धावांचे माेलाचे याेगदान आहे.

स्टोक्स एलिट क्लबमध्ये

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने (१७६) आता शतकी खेळीच्या बळावर नावे वेगळ्या कामगिरीची नाेंद केली. त्याच्या कसाेटी करिअरमध्ये ४ हजारांपेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. यात दहा शतकांचा समावेश आहे. ४ हजार धावा, दहा शतके व १५० पेक्षा अधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या एलिट क्लबमध्ये स्टाेक्सला स्थान मिळवता आले. यात गॅरी साेबर्स, इयान बाॅथम आणि जॅक कॅलिस यांचा समावेश आहे.