आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20:इंग्लंड महिला संघाचा मालिका विजय; विंडीज पराभूत

ब्रिजटाऊनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर चार्ली डीनच्या (४ बळी) सर्वाेत्तम खेळीच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर विंडीजवर मालिका विजय मिळवला. इंग्लंडने रविवारी तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये विंडीजचा पराभव केला. इंग्लंड संघाने १७ धावांनी सामना जिंकला. यासह यजमान इंग्लंड संघाने घरच्या मैदानावरील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली.

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १५७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विंडीज संघाला ८ गड्यांच्या माेबदल्यात १४० धावांपर्यंत मजल मारता आली. यासह टीमला आपली पराभवाची मालिका खंडीत करता आली नाही. सलगच्या तीन पराभवाने टीमला ही मालिका गमावावी लागली. यातून इंग्लंड संघाने गत चार वर्ष आणि १ महिन्यांपासूनची आपली विजयी माेहीम कायम ठेवली. आता टीम चाैथ्या विजयासाठी उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...