आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • England's First Innings On The First Day Of The Pink Ball Cassette; Seven Batsmen Failed To Sapshell; Crowley's Half century

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडची अक्षरश: दाणादाण:पिंक बॉल कसाेटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिल्या डावात 112 धावांत खुर्दा; सात फलंदाज सपशेल अपयशी; क्राऊलीचे अर्धशतक

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडने तिसऱ्या डे-नाइट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

यजमान टीम इंडियाचे युवा फिरकीपटू अक्षर पटेल (६/३८) अाणि अार. अश्विनने (३/२६) अक्षरश: पाहुण्या इंग्लंड टीमची पिंक बाॅल कसोटीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी पहिल्या डावात दाणादाण उडवली. यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ४८.४ षटकांत अवघ्या ११२ धावांवर अाटाेपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ९९ धावा काढल्या. अाता १३ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाचा राेहित शर्मा (५७) अाणि अजिंक्य रहाणे (१) मैदानावर कायम अाहेत. लिचने दाेन अाणि जाेफ्रा अार्चरने एक बळी घेतला.

इंग्लंडने तिसऱ्या डे-नाइट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या फिरकीच्या जोडीने कर्णधार रुटचा हा निर्णय चुकीचा ठरवला. पुन्हा एकदा भारताच्या फिरकीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकल्याने इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले. सात फलंदाजांना एकेरी धावा काढून पॅव्हेलियन गाठावे लागले. अक्षर, अश्विनने नऊ फलंदाजांना बाद केले. एक विकेट वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने घेतली. त्याने सलामीवीर सिब्लेला बाद करून टीम इंडियाला पहिल्या सत्रात विकेटचे खाते उघडून दिले. त्यानंतर हाच कित्ता गिरवत अक्षर व अश्विनने इंग्लंडचा धुव्वा उडवून टाकला. इंग्लंडकडून सलामीवीर क्राऊलीने एकाकी झुंज देताना ५३ धावांची खेळी केली. इतर फलंदाज फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवू शकले नाहीत.

दुसऱ्यांदा सर्वाेत्तम कामगिरी
भारताच्या अक्षरने ३८ धावांत ६ बळी घेतले. ही डे-नाइट कसाेटीत फिरकीपटूने केलेली दुसरी सर्वाेत्तम खेळी ठरली. ईशांतने बांगलादेशविरुद्ध २२ धावा देत ५ बळी घेतले हाेते.

पुजारा, कर्णधार काेहली बाद; राेहित शर्माचे अर्धशतक साजरे
भारतीय संघाचा तिसऱ्या स्थानावरील फलंदाज चेतेश्वर पुजारा सपशेल अयपशी ठरला. त्याला भाेपळाही फाेडता अाला नाही. त्यानंतर विराट काेहलीने २७ धावांची खेळी केली. मात्र, त्याला लिचने बाद केले. दरम्यान सलामीवीर राेहित शर्माने अापली झुंज कायम ठेवली. यातून त्याने नाबाद ५७ धावांची शानदार खेळी केली.

ईशांत शर्माचा स्मृतिचिन्ह देऊन गाैरव : करिअरमध्ये १०० वी कसाेटी खेळत असलेल्या ईशांत शर्माचा बुधवारी राष्ट्रपती काेविंद यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह अाणि कॅप देऊन गाैरवण्यात अाले.

दाैऱ्यातील पहिल्या डावात ५७८ धावा; त्यानंतर चार डावांत ५८८
इंग्लंड संघाने चेन्नईतील पहिल्या कसाेटीच्या पहिल्या डावात ५७८ धावा काढल्या. त्यानंतर इंग्लंड संघाला पुढच्या चार डावांत अवघ्या ५८८ धावा करता अाल्या. पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात इंंग्लंडने १९२, त्यानंतर दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात १३४ अाणि १६४ धावा काढून अापला गाशा गुंडाळला हाेता.

बातम्या आणखी आहेत...