आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे क्रिकेट:इंग्लंडची विक्रमी 498 धावसंख्या; चौकार-षटकारांतून 300 धावा

आम्सटलवेन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल साल्ट (१२२), डेव्हिड मलान (१२४) आणि जोस बटलरने (नाबाद १६२) शानदार शतकी खेळीतून इंग्लंडला वनडे फॉरमॅटमध्ये विश्वविक्रमी धावसंख्या उभी करून दिली. याच झंझावाताच्या बळावर इंग्लंडने वनडेत यजमान हॉलंड टीमविरुद्ध ४ बाद ४९८ धावा काढल्या. यामध्ये फटकेबाजीतून ३०० धावांची भर पडली. यामुळे इंग्लंड टीमला आपलाच २००७ मधील वनडेत सर्वाेच्च धावसंख्येचा विक्रम ब्रेक करता आला. यजमान हॉलंड संघाचे गाेलंदाज घरच्या मैदानावर अपयशी ठरले. इंग्लंड साल्टने ९३ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांसह १२२, मलानने १०९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२५ आणि जोस बटलरने ७० चेंडूंत ७ चौकार व १४ षटकारांसह नाबाद १६२ धावांची खेळी केली.

इंग्लंडने २६ चेंडूंत काढल्या १०० धावा
इंग्लंड संघाचा जेसन राॅय (१) हा फक्त स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. साल्ट आणि मलानने दुसऱ्या विकेटसाठी २२२ धावांची माेठी भागीदारी रचली. लियाम लिव्हिंगस्टाेनने २२ चेंडूंत प्रत्येकी सहा चौकार व षटाकरांसह नाबाद ६६ धावा काढल्या. षटकार व चौकारांच्या आतषबाजीतून इंग्लंडला ३०० धावांची कमाई करता आली. हॉलंडचा फिलिप्पे महागडा गाेलंदाज ठरला. त्याने १० षटकांत १०८ धावा दिल्या. इंग्लंडने ३५० ते ४५० धावांचा पल्ला २६ चेंडूंत गाठला.

वनडेतील टॉप-३ स्कोअर इंग्लंड टीमच्या नावे नोंद
धावसंख्या संघ प्रतिस्पर्धी
498/4 इंग्लंड हॉलंड
481/6 इंग्लंड ऑस्ट्रेलिया
444/3 इंग्लंड पाकिस्तान

बातम्या आणखी आहेत...