आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्वचषक:इंग्लंड संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम; न्यूझीलंडवर पॅकअपचे सावट

हॅमिल्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

गत चॅम्पियन इंग्लंड संघाने महिलांच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. इंग्लंड महिला संघाने रविवारी यजमान न्यूझीलंडला घरच्या मैदानावर धूळ चारली. इंग्लंडने १ विकेटने रोमहर्षक विजयाची नाेंद केली.

न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर इंग्लंड टीमसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६ चेंडू आणि एक विकेट राखून सामना जिंकला.

त्यामुळे आता इंग्लंड संघाला विजयी मोहीम कायम ठेवताना अंतिम चारमधील प्रवेशाची संधी आहे. मात्र, लाजिरवाण्या पराभवामुळे यजमान न्यूझीलंड टीमवर स्पर्धेतून पॅकअप हाेण्याचे सावट आहे. इंग्लंड हा एका विकेटने सामना जिंकणारा विश्वचषकातील दुसरा संघ ठरला. यापूर्वी श्रीलंका टीमने २०१३ मध्ये इंग्लंडवर मात केली हाेती. आता इंग्लंड टीमचे गुणतालिकेत चार गुण झाले आहेत. सहा वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. टीमने गत सामन्यात शनिवारी भारतावर मात केली. यासह ऑस्ट्रेलिया हा उपांत्य फेरी गाठणारा यंदा पहिला संघ ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...