आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी:इंग्लंडचा पाकमध्ये 22 वर्षांनी मालिका विजय

मुलतान3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड संघाने दाैऱ्यात यजमान पाकिस्तान टीमवर २२ वर्षांनी कसाेटी मालिका विजय मिळवला. इंग्लंड संघाने साेमवारी दुसऱ्या कसाेटीत पाकचा पराभव केला. बेन स्टाेक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने २६ धावांनी दुसरी कसाेटी जिंकली. खडतर ३५५ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला दुसऱ्या डावात ३२८ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. मार्क वूडने सर्वाधिक ४, आेली राॅबिन्सन आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी २, जॅक लीच आणि ज्याे रुटने प्रत्येकी १ बळी घेतला. इंग्लंड संघाने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. शतकी खेळी करणारा ब्रुक्स सामनावीरचा मानकरी ठरला. तिसऱ्या कसाेटीला शनिवारपासून सुरुवात हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...