आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • England's Tour To Pakistan In Doubt As New Zealand Cancel Series Due To Security Reasons ; England Team Has To Play T20 Match In Pakistan Before T20 World Cup; News And Live Updates

पाकला दुसरा झटका:आधी न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केला, आता इंग्लंड सुद्धा असाच निर्णय घेण्याच्या तयारीत! लवकरच करणार अधिकृत घोषणा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडने 2005 नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही

न्यूझीलंड संघाने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. हा दौरा पुर्ण करण्यासाठी खुद पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना फोन केला होता. परंतु, इम्रान खान यांचे प्रयत्नदेखील अपयशी ठरले होते. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका मिळाला असून अनेक खेळाडूंकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे, न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याने ईसीबीदेखील यावर विचार करत आहे. कारण इंग्लंड संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानमध्ये टी-20 सामना खेळायचा आहे. जर ईसीबीनेदेखील असाच निर्णय घेतला तर पाकिस्तानाला दुहेरी झटका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड 48 तासांच्या आता यावर निर्णय देईल असे निवेदन जारी करत ईसीबीने म्हटले आहे.

इंग्लंड संघाचा पुढील महिन्यात पाकिस्तान दौरा
इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ पुढील महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यानुसार, पुरुष संघाला विश्वचषकापूर्वी 13 आणि 14 ऑक्टोबर दरम्यान टी-20 सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी यूएईला जाणार आहे. परंतु, या निर्णयानंतर इंग्लंड संघ सरळ पाकिस्तानला न जाता यूएईला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या महिला संघाला पाकिस्तान दौऱ्यावर 2 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. महिला संघाचे 13 आणि 14 ऑक्टोबरला टी-20 सामने खेळले जाणार आहेत. तर एकदिवसीय सामने 17, 19 आणि 21 ऑक्टोबरला खेळले जातील.

इंग्लंडने 2005 नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही
इंग्लंड संघाचा हा दौरा पाकिस्तान क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. कारण इंग्लंडने 2005 नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. विश्वचषकापूर्वी दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेला नवी सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. कोरोना लॉकडाऊनच्या वेळी पाकिस्तानने बायोबबलच्या आत इंग्लंडमध्ये जाऊन क्रिकेट खेळले. जर हा दौरा सुरक्षेच्या कारणामुळे रद्द करण्यात आला, तर त्याचा परिणाम 2022 च्या कसोटी दौऱ्यावर देखील होईल असे क्रिकेट जाणकार सांगतात. कारण पुढील वर्षी इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये जाऊन कसोटी मालिका खेळायची आहे.

बातम्या आणखी आहेत...